

कर्नाटकातील विजयपुरा येथे खासगी प्रशिक्षण विमान कोसळले
रेड बर्ड कंपनीचं प्रशिक्षण विमान अपघातग्रस्त
दोन जण जखमी; सुदैवाने जीवितहानी नाही
कर्नाटकातील विजयपुरा येथून मोठी बातमी येत आहे. येथे एका खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. विजयपुरा जिल्ह्यातील बालासोर तालुक्यातील मंगलोर गावात रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या वृत्तानुसार रेड बर्डचे एक खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे.
माहितीनुसार,याआधी विजयपुरा जिल्ह्यातील बालासोर तालुक्यातील मंगलोर गावात रविवारी ही घटना घडली. रेड बर्डचे एक खासगी प्रशिक्षण विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच, बालासोर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही घटना बालासोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपघाताच्या कारणाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कुलबर्गीजवळ असतानाच विमान हवेत तिरपं झालं होतं. पायलटमध्ये विमानाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मंगळुरूमधील शेतात विमान कोसळलं. विमानात असलेले दोन जण जखमी झाले आहेत. विजयुपराच्या मंगळुरू गावातील शेतात झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास केला जातोय. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, इंधन कमी असल्यानं विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाहीये.
स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. रेड बर्ड एव्हिएशनकडूनही कोणतेही विधान आलेले नाही. रेडबर्ड एव्हिएशन ही भारतातील एक प्रमुख उड्डाण प्रशिक्षण अकादमी आहे. येथे सेसना १७२ टँगो चार्ली खासगी जेटवर उड्डाण प्रशिक्षण देते आणि प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाच्या विमानांचा वापर करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.