Mallikarjun Kharge: पंतप्रधानांचं बोलणं ऐकून हसू येतं; महात्मा गांधींवरील वक्तव्यावरून खरगेंचा मोदींना टोला

Mallikarjun Kharge Slams PM Modi : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. महात्मा गांधींवर पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरून खरगेंनी मोदींना खडेबोल सुनावलेत.
Mallikarjun Kharge: पंतप्रधानांचं बोलणं ऐकून हसू येतं; महात्मा गांधींवरील वक्तव्यावरून खरगेंचा मोदींना टोला
Mallikarjun Kharge Slams PM Modi
Published On

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधीबद्दल कधीच वाचलं नसेल. त्यामुळे त्यांना संविधानसंदर्भातही काहीच माहिती नसेल, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पीएम मोदींवर केलीय. मला 'गांधी' चित्रपट पाहून महात्मा गांधींबद्दल माहिती मिळाली असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यावरून टीका करताना खरगे म्हणाले की, पंतप्रधान मोदी जे बोलतात ते ऐकून मला हसू येतं, कदाचित नरेंद्र मोदींनी गांधीजींबद्दल कधीच वाचले नसावं असं खरगे म्हणालेत.

पुढे बोलताना खरगे म्हणाले, महात्मा गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं, जगात विविध ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत. नरेंद्र मोदींना महात्मा गांधींबद्दल माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनाही कळणार नसल्याचा टोलाही त्यांनी मोदींना लगावला. महात्मा गांधीजींचा अहिंसेवर विश्वास होता, त्यांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण नरेंद्र मोदी फक्त द्वेषावर बोलतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून द्वेष दिसून येत असल्याचंही खरगे म्हणालेत.

एक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजींबद्दल भाष्य केलं होतं. मोदींच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांचे नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जातोय. काँग्रेस नेहमीच जनतेच्या समस्या लक्षात घेऊन काम करते, असेही खरगे यावेळी म्हणाले. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान पदी विराजमान होते त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी काँग्रेसने गरिबांसाठी अनेक योजना आणल्या. याचा फायदा गरीब जनतेला झाला, पण नरेंद्र मोदींनी बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, घटनात्मक संस्थांचा गैरवापर या मुद्द्यांना प्रोत्साहन दिलं.

या मुद्द्यांवर आम्ही लढलो, त्यात आम्हाला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळाला, असल्याचा दावा खरगे यांनी केलाय. मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान ४२१ वेळा 'मंदिर-मशीद' आणि फुटीरतावादी मुद्द्यांवर प्रचार केल्याचं खरगे म्हणाले. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जात आणि धर्माच्या आधारावर मतांसाठी आवाहन न करू नये असं निवडणूक आयोगाने म्हटलंय.

Mallikarjun Kharge: पंतप्रधानांचं बोलणं ऐकून हसू येतं; महात्मा गांधींवरील वक्तव्यावरून खरगेंचा मोदींना टोला
PM Narendra Modi Rally : ते संविधान आणि डॉ. आंबेडकरांच्या भावनांचा अपमान करताहेत; PM मोदींचा INDIA आघाडीवर निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com