PM Narendra Modi Rally : ते संविधान आणि डॉ. आंबेडकरांच्या भावनांचा अपमान करताहेत; PM मोदींचा INDIA आघाडीवर निशाणा

Pm Narendra Modi On India Aghadi: आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावरून पीएम मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करण्याचे त्यांचे आणखी एक मोठे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
PM Narendra Modi Rally : ते संविधान आणि डॉ. आंबेडकरांच्या भावनांचा अपमान करताहेत; PM मोदींचा INDIA आघाडीवर निशाणा
Punjab PM Modi RallySaam Tv

'त्यांनी संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasabheb Ambedkar) भावनांचा अपमान केला.' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबच्या होशियारपूरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधला. 'त्यांना दलित आणि मागासलेल्यांचे आरक्षण हिसकावून ते मुस्लिमांना द्यायचे आहे.', असा देखील आरोप त्यांनी काँग्रेसवर (Congress) केला आहे.

पीएम मोदी यांनी या सभेमध्ये भाषण करताना सांगितले की, 'मोदींनी एक संकल्प केला आहे की दलित, मागालेले आणि आदिवासींचे आरक्षण कोणालाही हिसकावून देणार नाही. माझ्या १० वर्षांच्या सरकारच्या काळामध्ये मी लागोपाठ एसी-एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाचे रक्षण केले आहे. हे काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले माझ्या या प्रयत्नांमुळे भडकले आहेत. आरक्षणावरून त्यांचा हेतू खूपच खतरनाक आहे. त्यांचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड हा एससी-एसटी आणि ओबीसचे आरक्षण हिसकावून घेण्याचा आहे.'

तसंच, 'सरकारी नोकरीमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण असो, फोर्समध्ये, सरकारी टेंडरमध्ये, युनिव्हर्सिटीच्या दाखल्यामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण हिसकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते संविधानाच्या भावना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनांचा अपमान करत आहेत. त्यांना दलित आणि मागासलेल्यांचे आरक्षण हिसकावून ते फक्त मुस्लिमांना द्यायचे आहे. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करण्याचे त्यांचे हे आणखी एक मोठे षडयंत्र आहे. २०२४ च्या या निवडणूक अभियानामध्ये मोदींनी त्यांच्या या सर्वात मोठ्या षडयंत्रावरून पडदा उचलला. त्यांचा प्रयत्न मोडून काढला म्हणून ते संतापले आहेत. त्यामुळे ते लागोपाठ मोदींना शिव्या देत आहे.', अशी टीका पीएम मोदींनी केली.

पीएम मोदींनी याआधी उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती येथे झालेल्या सभेमध्ये देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी घटनादुरुस्ती आणि आरक्षण रद्द करण्याबाबत विरोधकांच्या विधानाचे पंतप्रधानांनी खंडन केले होते. त्यांनी सांगितले होते की, 'जोपर्यंत मोदी जिवंत आहेत तोपर्यंत गरीब, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मी वंचितांच्या हक्काचा चौकीदार आहे याची मी हमी देतो.'

PM Narendra Modi Rally : ते संविधान आणि डॉ. आंबेडकरांच्या भावनांचा अपमान करताहेत; PM मोदींचा INDIA आघाडीवर निशाणा
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले होते; माकपच्या नेत्याचं मोठं विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com