Punjab Election 2022: मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट, युवकांना मोठं आवाहन

पंजाबमध्ये आज ११७ जागाकरिता मतदान होत आहे.
PM Modi
PM ModiSaam TV

वृत्तसंस्था: पंजाबमध्ये आज ११७ जागाकरिता मतदान होत आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील तिसऱ्या टप्प्यात ५९ जागाकरिता आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्वीट (Tweet) करत मोठ्या संख्येने मतदान (Voting) करण्याचे मतदारांना यावेळी आवाहन केले आहे. विशेषत: तरुणांना आणि प्रथमच मतदान (Voting) करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. (Prime Minister Narendra Modi tweet before voting big appeal youth)

हे देखील पहा-

तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशला कुटुंबवाद, जातिवादापासून मुक्त करण्याकरिता विकासाला गती देणाऱ्या सरकारला निवडून देण्याकरिता तुमचे मत अतिशय महत्त्वाचे असल्याचे अमित शाह यांनी यावेळी म्हटले आहे. तर पंजाबला (Punjab) सुरक्षीत ठेवण्याकरिता राज्याला एकत्र ठेवणारे सरकार निवडा असे देखील गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. पंजाबचा सुवर्ण आणि गौरवशाली इतिहास आहे. ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणार आहे.

मी पंजाबच्या मतदारांना आवाहन करत आहे की, राज्य सुरक्षित ठेवा आणि सांस्कृतिक वारसा जोपासा आणि गुरूंची समृद्ध परंपरा पुढे चालू ठेवा. पंजाब आणि देशाला एकसंध ठेवणारे सरकार निवडण्याकरिता आज मतदान करा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश मधील तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया आज पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील १६ जिल्ह्यात ५९ जागाकरिता मतदान होत आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

PM Modi
Petrol Diesel Prices : 5 राज्यांच्या निवडणुकीत चर्चा पेट्रोल- डिझेलच्या भावावर

पंजाब मधील ११७ जागांसाठी मतदान सुरू आहे. पंजाबमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सायकांळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com