PM Modi: पंतप्रधान मोदींचं हर हर गंगे; दिल्लीत मतदान होत असताना महाकुंभात पवित्र स्नान, विरोधकांचा सवाल

Prime Minister Modi Took Holy Bath: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभात शाहीस्नान केलंय..मात्र मोदींनी आजचाच दिवस का निवडला? आणि त्यावर विरोधकांनी का आक्षेप घेतला ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Prime Minister Modi Took  Holy Bath
Prime Minister Modi Took Holy Bathbusiness standard
Published On

भगवी वस्त्र, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि मुखानं नामजप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी प्रयागराजमधील संगमात स्नान केलं. स्नानानंतर, पंतप्रधानांनी सूर्याला अर्घ्य अर्पण केलं. सुमारे 5 मिनिटे मंत्र जप करून सूर्यपूजा केली. संगम नोझवर गंगेची पूजा केली. गंगा मातेला दूध अर्पण केले आणि साडी अर्पण केली.

दरम्यान, कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्यासारखे शुभ दिवस निवडले जातात. परंतु मोदींनी 5 फेब्रुवारीचा दिवस का निवडला, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याची काय कारणं आहेत पाहूया.

मोदींनी का निवडला 5 फेब्रुवारीचा दिवस?

माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीतील अष्टमीची तिथी

शास्त्रानुसार ध्यानधारणेसाठी अत्यंत शुभ दिवस

पवित्र संगमात स्नान करून पितरांचं स्मरण करण्याची प्रथा

असं असलं तरी मोदींच्या या पवित्रस्नानावर विरोधकांनी निशाणा साधलाय. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवसच मोदींनी निवडल्यामुळे त्यांच्या गंगास्नानावर टीका करण्यात आली. राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं आणि ते साधण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहिर आहेत हे वेगळं सांगायला नको.आणि त्यामुळेच मोदींच्या गंगास्नानाचं कनेक्श्न दिल्लीतल्या मतदानाशी जोडण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com