पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान बांधण्यात येत असलेला बुलेट ट्रेन कॉरिडॉर लवकरच तयार होत आहे. बोगद्यापासून ते स्टेशनपर्यंतचे काम पूर्णत्वास आले आहे. गुजरातमधील सुरत आणि बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला विभाग २०२६ मध्ये सुरू होऊ शकतो.(Latest News)
कुठे धावणार बुलेट ट्रेन ?
मुंबई-अहमदाबादपर्यंत धावणाऱ्या बुलेट ट्रेनसंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेटचा पहिला विभाग २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मंजुरी दिली असती तर हा प्रकल्प लवकर सुरू झाला असता, असं रेल्वेमंत्र्यांनी विक्रोळी बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्पाची पाहणी करताना सांगितले. "हा भारताचा पहिला हाय-स्पीड कॉरिडॉर प्रकल्प आहे." या प्रकल्पातील आमचा सर्वात मोठा उद्देश त्याच्या डिझाइनमधील आव्हाने आणि क्षमता समजून घेणे आहे.
या हाय-स्पीड ट्रेनचा पहिला विभाग जुलै-ऑगस्ट २०२६ मध्ये सूरत आणि बिलीमोरा दरम्यान सुरू होईल. हायस्पीड रेल्वे प्रकल्पात शिंकनसेन यंत्रणा बसवली जात आहे. ही जगातील सर्वात सुरक्षित प्रणालींपैकी एक असल्याचं केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले. याविषयी अधिक माहिती देताना वैष्णव म्हणाले, २१ किमी लांबीच्या बोगद्यावर काम सुरू आहे. त्याचा एक भाग (७ किमी) समुद्राखाली असेल. नवीन पायाभूत सुविधांमध्ये पाण्याखाली ५६ मीटर खोल बिंदू असेल. बोगद्याची रुंदी सुमारे ४० फूट असेल आणि त्यामुळे ट्रेन ३२० किमी/तास वेगाने धावू शकेल.
देशातील आणि कदाचित परदेशातील हा पहिलाच इतका लांब बोगदा असेल असं रेल्वेमंत्री म्हणाले. या बोगद्याची लांबी २१ किलोमीटर असेल ठाणे ते मुंबईतील बीकेसी असा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यातील ७ किलोमीटर लांबीचा मार्ग समुद्राखालून जाणार आहे. BKC मध्ये बुलेटचं ऑफिस होणार आहे. बुलेट ट्रेन स्टेशन हे खूपच वेगळे असेल, यात १० मजली इमारत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी भारताला जपानकडून मदत मिळत आहे.
बुलेट ट्रेनचा वेग आणि तंत्रज्ञान
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, बुलेट ट्रेन ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावेल. ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर केवळ १२७ मिनिटांत पूर्ण करेल. सध्या या दोन शहरांमध्ये बसने प्रवास करण्यासाठी ९ तास आणि ट्रेनने ६ तास लागतात. दरम्यान NHSRCL ने प्रकल्पामध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलाय.
बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानचे खास तंत्रज्ञान शिंकानसेनचा वापर करण्यात आलाय. २०१५ मध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला होता. आता हा प्रकल्प पुन्हा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
कसा असेल ट्रेनचा मार्ग
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपासून सुरू होणारी बुलेट ट्रेन अहमदाबादच्या साबरमती स्थानकापर्यंत पोहोचेल. गुजरातमधील ८ जिल्हे, महाराष्ट्रातील ३ जिल्हे आणि दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून ही ट्रेन आपला प्रवास करेल. बुलेट ट्रेन मुंबई-बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांवर थांबा घेणार आहे.
बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये आणि फायदे
१२ स्थानके, ३२० किमी वेगाने धावतील आणि गुजरात ते मुंबई हे अंतर २ तासांत पूर्ण होईल.
ही ट्रेन ५०८ किमी अंतरापैकी ३५१ किमीचा मार्ग गुजरातमधून तर १५७ किमीचा मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे.
बुलेट ट्रेन ७० महामार्ग आणि २१ नद्या पार करेल. १७३ मोठे आणि २०१ छोटे पूल बांधले जाणार आहेत.
यात गुजरातमधील ६ नद्या (वलसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला पूल बांधला जाईल. (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा) आणि वेंगानिया (नवसारी जिल्हा) येथे पूल बांधण्यात येत आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत १.०८ लाख कोटी रुपये आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) असे या प्रकल्पाचे नाव आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनचा कमाल वेग ३५० किमी/तास असेल. सरासरी वेग १७० किमी/तास असेल.
मुंबई स्टेशन भूमिगत असेल. ९२% म्हणजेच ४६८ किमी लांबीचा ट्रॅक तयार केला जात आहे.
मुंबई ते अहमदाबाददरम्यान १० डब्यांच्या एकूण ३५ बुलेट ट्रेन धावणार आहेत.
ट्रेन दररोज ७० फेऱ्या करतील. बुलेट ट्रेनमध्ये ७५० लोक बसू शकतील. नंतर १२०० लोकांसाठी १६ डबे जोडले जातील.
२०५० पर्यंत या गाड्यांची संख्या १०५ पर्यंत वाढवण्याची योजना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.