अनेकांना विविध ठिकाणी फिरायाला जायला आवडतं. मात्र, काही जण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने प्लान रद्द करतात. मात्र, आता पैशांची चिंता करू नका. भारतीय रेल्वेने जबरदस्त आणि सर्वाधिक स्वस्त प्लान आणला आहे. आयआरसीटीसीने सात ते आठ दिवसांचा सर्वाधिक स्वस्त टूर प्लान आणला आहे. तुम्ही या पॅकेजमधून वैष्णो देवी, कांगडा, धर्मशाला, कटरा आणि अमृतसर या ठिकाणी फिरता येईल. (Latest Marathi News)
आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर या पॅकेजची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पॅकेजसाठी NCH29 कोड देण्यात आला आहे. आयआरसीटीने ग्राहकांसाठी २१,२०५ रुपयांमध्ये टूर प्लान आणला आहे. तसेच पॅकेज टूरमुळे प्रसिद्ध मंदिर आणि निसर्गाच्या ठिकाणीही फिरता येणार आहे.
आयआससीटीसीचा हा टूर प्लान १० दिवसांचा आहे. या प्लानमध्ये रुममध्ये राहण्याच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही रुममध्ये एकटेच राहणार असाल तर तुम्हाला टूर प्लानसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. दोघे जण एकाच रुमध्ये राहणार असाल तर कमी पैशे मोजावे लागतील.
या टूरदरम्यान तिघे जण एकाच रुममध्ये राहणार असेल तर एका रुमसाठी १३,३२० रुपये मोजावे लागतील. ५ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी बेडसोबत ८,८५० रुपये मोजावे लागतील.
तुम्ही पीक सीझनमध्ये या टूर प्लानचा विचार करत असाल, तर वेगळे चार्ज द्यावे लागतील. पीक सिझनमध्ये तुम्ही एकट्यासाठी रुम हवी असेल तर ५२,७३० रुपये मोजावे लागतील. तुम्ही दोन जण एकाच रुममध्ये राहत असाल तर त्यासाठी २७,२५५ रुपये मोजावे लागतील.
या टूरवेळी तिघे जण एकाच रुममध्ये राहणार असतील तर २१,४५५ रुपये मोजावे लागतील. ५ ते ११ वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी बेडसोबत १४,८०५ रुपये तर ५ ते ११ वर्ष वयोगटातील मुलांसाठी १२,७३० रुपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.