Shatabdi Express: भारतात देशी बुलेट ट्रेन 'शताब्दी ट्रेन'ची सुरुवात कशी झाली? कशी सुचली होती रेल्वेची कल्पना?

Shatabdi Express : १९९०च्या काळात शताब्दी एक्सप्रेस रेल्वेंना देशी बुलेट दर्जा मिळाला म्हटलं जात होतं. भारतात शताब्दी रेल्वेंची सुरुवात कशी झाली. या रेल्वे सुरू करण्याची कल्पना कशी सुचली. या प्रश्नांचे उत्तर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी दिलंय.
Shatabdi Express
Shatabdi ExpressSaam Tv
Published On

Jyotiraditya M Scindia Shatabdi Express History :

सध्या वंदे भारत या रेल्वेची चर्चा देशभरात होते. वंदे भारत रेल्वेला सद्यस्थितीतील सर्वोत्कृष्ट रेल्वे असल्याचं म्हटलं जातं. पुढील काळात भारतात बुलेट ट्रेन धावणार आहे.परंतु याआधी भारतात सर्वात वेगवान आणि सर्वोत्कृष्ट रेल्वे होती ती म्हणजे शताब्दी एक्सप्रेस. १९८० ते १९९० च्या दशकात या रेल्वे भारतात धावल्या होत्या. या रेल्वेंना देशी बुलेट ट्रेन म्हटलं जात होतं. या शताब्दी रेल्वेची सुरुवात भारतात कशा सुरू झाल्या.या रेल्वे सुरू करण्याची कल्पना कशी सुचली याचे उत्तर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलंय. (Latest News)

माजी रेल्वेमंत्री माधवराव सिंधिया यांच्या मुलाने म्हणजेच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एका मुलाखतीत याचे उत्तर दिलंय. माधवराव सिंधिया यांनी १९८८ मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्त दिल्ली आणि झांसीला जोडणारी पहिली शताब्दी एक्सप्रेसचं लोकापर्ण केलं होतं. माधवराव सिंधिया यांनी राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात १९९८६ ते १९८९ पर्यंत रेल्वे मंत्री म्हणून काम केलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशात शताब्दी एक्सप्रेस सुरू करणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी ते पूर्ण केलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं की, जपान आणि फ्रान्सच्या यात्रेदरम्यान त्यांच्या वडिलांनी हाय-स्पीड रेल्वेच्या प्रणालीचं सर्वेक्षण केलं होतं. जपान आणि फ्रान्सच्या यात्रेतूनच माधवराव सिंधिया यांनी भारतीय रेल्वेमधील सुधार आणला. रेल्वेची माहिती घेण्यासाठी माधवराव सिंधिया स्वतःच्या खर्चावर विदेश दौऱ्यावर जात.

जपानच्या यात्रेदरम्यान माधवराव सिंधिया यांनी बुलेट ट्रेनचं संचालन पाहिलं आणि या रेल्वेंनी माधवराव सिंधिया यांना खूप प्रभावित केलंय या रेल्वे आपल्या थांब्यावर थांबायच्या आणि पुढील प्रवास जलद गतीने करायच्या. हीच गोष्ट माधवराव सिंधिया यांना भावली आणि त्यांनी भारतात शताब्दी एक्सप्रेस रेल्वे आणली.

त्यानंतर माधवराव सिंधिया यांनी फ्रान्सचा दौरा केला. तेथील हाय स्पीड रेल्वेमध्ये प्रवाशांना जेवनाची सुविधा पुरवली जात होती. त्या रेल्वेंमध्ये कॅसरोलमध्ये पदार्थ दिले जात होते. यामुळे शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये भारतीय रेल्वेद्वारे वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक मेटल प्लेट्सऐवजी फॉइल-आधारित खाद्यपदार्थ सर्व्ह करण्याच्या प्रणालीची सुरुवात झाल्याचं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं.

Shatabdi Express
Mumbai Local Train : 'तुम्ही काही रेल्वेचे जावई नाही...', फुकट्या रेल्वे प्रवाशांना मराठमोळा डोस, ६० वर्षाच्या आजीची कविताही होतेय तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com