Independence Day 2026: ‘ऑपरेशन सिंदूर’ते Gen-Z ; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचा राष्ट्राला संदेश

President Murmu Independence Day Speech: राष्ट्रपती मुर्मू यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. त्यांनी आधुनिक भारताची प्रगती, 'ऑपरेशन सिंदूर'मधील भारतीय लष्कराचे शौर्य आणि दहशतवादी जाळ्यांवरील कारवायांवर प्रकाश टाकला.
OPERATION SINDOOR TO GEN-Z: PRESIDENT MURMU’S BIG MESSAGE ON EVE OF 80TH INDEPENDENCE DAY
OPERATION SINDOOR TO GEN-Z: PRESIDENT MURMU’S BIG MESSAGE ON EVE OF 80TH INDEPENDENCE DAYsaam tv
Published On
Summary
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन

  • ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्रपती मुर्मूंचा मोठा संदेश

  • 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे भाषण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. अवघ्या काही तासांतच देशाच्या स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षाची मंगलमय सुरुवात होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एकीकरणाचे आव्हान समोर होते. सरदार पटेल हे त्या एकतेचे शिल्पकार होते. आज आपण आधुनिक भारत घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपले विद्यार्थी हेच भारताच्या भविष्याचे शिल्पकार असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या आहेत. परीक्षा सुधारणांसाठी सरकार मोठी पावले उचलत असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि उत्तम बनवली जातेय.

OPERATION SINDOOR TO GEN-Z: PRESIDENT MURMU’S BIG MESSAGE ON EVE OF 80TH INDEPENDENCE DAY
Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

भारताचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश

'ऑपरेशन सिंदूर'ने दहशतवादी नेटवर्कवर अचूक हल्ले करण्याची भारतीय सशस्त्र दलांची क्षमता सिद्ध केली,असे म्हणत राष्ट्रपती मुर्मू यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिलाय. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबतचा सिंधू पाणी करार निलंबित करणे हे राष्ट्रीय हिताचे, विशेषतः शेतकऱ्यांसाठी, एक निर्णायक पाऊल असल्याचं म्हटलंय.

OPERATION SINDOOR TO GEN-Z: PRESIDENT MURMU’S BIG MESSAGE ON EVE OF 80TH INDEPENDENCE DAY
India Terror List: पाकिस्तानातील 23 दहशतवाद्यांवर भारताची सर्वात कारवाई, गृह मंत्रालयाच्या निर्णयाने उडाली खळबळ

राष्ट्रपतींनी देशाला नक्षलमुक्त करण्याला एक मोठी राष्ट्रीय कामगिरी असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रपती मूर्मू यांनी बस्तरमध्ये होत असलेल्या जलद विकासावर आणि सांस्कृतिक सहभागावर प्रकाश टाकला. यासह त्यांनी जागतिक अस्थिरता असूनही, देशाचा आर्थिक विकास दर जागतिक सरासरीच्या दुप्पटाहून अधिक राहण्याचा अंदाज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वर्तवलाय.

राष्ट्रपतींनी सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समान संधी मिळतील. ते भारताला जगातील अग्रेसर राष्ट्र बनवण्याच्या ध्येयात योगदान देतील. राष्ट्रपतींनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीय तो अभिमानाने फडकवतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत गुलामगिरीच्या साखळदंडांमधून मुक्त झाला आणि प्रत्येक नागरिक स्वतंत्र भारताच्या भविष्याचा शिल्पकार बनला.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, राष्ट्र उभारणीत विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ (इंजिनिअर), डॉक्टर, आरोग्यसेवक, कामगार आणि शेतकरी महत्त्वाकांक्षी भूमिका बजावत आहेत. याशिवाय खेळाडू, कारागीर, कलाकार, विचारवंत, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, सरकारी कर्मचारी, गुंतवणूकदार आणि सामाजिक कार्यकर्तेही राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देत आहेत. राष्ट्रपतींनी स्पष्ट केले की, संविधानात दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणारा प्रत्येक नागरिक राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सक्रिय भागीदार आहे.

जगात भारताचा डिजिटल डंका

भारताच्या डिजिटल सामर्थ्याचा जागतिक स्तरावर प्रभाव असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, जगातील एकूण 'रिअल-टाइम' डिजिटल व्यवहारांपैकी निम्म्याहून अधिक व्यवहार भारतात होतात.

गेल्या दशकातील सर्वसमावेशक विकासाच्या उपक्रमांमुळे २५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले. त्याचबरोबर, मोफत रेशन योजनेद्वारे ८० कोटींहून अधिक लाभार्थ्यांची अन्नसुरक्षा सुनिश्चित केली जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com