Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Mamata Banerjee On Political Retirement: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पराभवानंतर राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण याबाबत आता त्यांनी मोठं विधान केले.
Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ
Mamata BanerjeeSaam Tv
Published On
  • पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जींचे मोठे विधान

  • ममता बॅनर्जी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू

  • ममता बॅनर्जींचे राजकीय निवृत्तीबाबत स्पष्टीकरण

  • भाजपविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचे केले स्पष्ट

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने टीएमसीला धक्का देत सत्ता मिळवली. पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत मोठं विधान केले आहे. ममता बॅनर्जी राजकीय निवृत्ती घेतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर त्यांनी आता स्पष्टपणे सांगितले की, 'मी राजकारणातून निवृत्त होणार नाहीत. जोपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला बाजूला करत नाही तोपर्यंत मी थांबणार नाहीत.'

ममता बॅनर्जी यांनी हे विधान अशावेळी केलं जेव्हा त्यांचा पक्षाला मोठ्या बंडाचा सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी, आमदार आणि खासदार त्याचसोबत त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. एकापोठापाठ ममता बॅनर्जी यांना धक्के बसत चालले आहेत. अशातच त्यांनी निवृत्तीबाबत केलेल्या विधानावरून आता जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा राजकीय डाव; भाजपच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट करत सांगितले की, 'राज्यात सत्तांतर होऊन ४ महिनेच झाले असताना जनतेने भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा पाहिला आहे. भाजप मला सभा घेऊ देत नाही. केवळ परवानगी मिळत नाही म्हणून मी राजकारणातून निवृत्त होईन असं ज्यांना वाटते गैरसमजात आहेत. जोपर्यंत भाजपला स्वतःहून राजकीय निवृत्ती घेण्यास भाग पाडले जात नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही.'

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं

ममता बॅनर्जी यांनी असा आरोप केला की, पोलिस नागरिकांना टीएमसीच्या ममता बॅनर्जी गटाला पाठिंबा देऊ नका असे सांगत आहेत. पोलिस टीएमसी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत आहेत. एसपी जिल्हाध्यक्षांसारखे काम करत आहेत. तर भाजपचे आयसी ब्लॉक अध्यक्षांप्रमाणे काम करत आहेत. १२,००० ते १४,००० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही गद्दार आणि लुटारूंच्या मदतीने लोकांना भाजपमध्ये सामील होण्यास सांगितले जात आहे.politics

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ
Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, जादवपुर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये एबीव्हीपी आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला होता. याद्वारे युनिव्हर्सिटीतील शांततेचा भंग केला गेला. ममता बॅनर्जी यांनी असा आरोप केला की, जनगणना प्रक्रिया ही राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) लागू करण्याचा आणखी एक 'चोरवाटेचा प्रयत्न' असून ती राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता राबवण्यात आली.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com