Political News: मोठी बातमी! माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Madhya Pradesh News: मध्य प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली. माजी खासदारासह ६३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे राजकारणात खळबळ उडाली.
Political News: मोठी बातमी! माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Case Register Against Ex MPSaam Tv
Published On
  • माजी खासदार कंकर मुंजारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

  • बालाघाट किरनापूर हिंसाचार प्रकरणात कारवाई

  • कंकर मुंजारे यांच्यासह ६३ जणांविरोधात गुन्हा

  • किरनापूर हिंसाचार प्रकरणात पोलिसाची मोठी कारवाई

मध्य प्रदेशमधून मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट पोलिसांनी माजी खासदार कंकर मुंजारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कंकारे मुंजारे आणि इतर ६२ जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १६ वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरणपूर शहरात १५ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाघाट जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या किरणपूर या गावात चोरीच्या संशयावरून पोलिसांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. यामध्ये मारार माळी समाजाचे ब्लॉक अध्यक्ष हिम्मतलाल गढवंशी, राधेश्याम सिघंधुपे आणि प्रकाश बाहे यांच्यासह २८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी पीडितेचे पती कैलाश चौधरी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Political News: मोठी बातमी! माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Political Crisis News : राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत निर्णय येणार

माजी खासदाराने या कृत्याला द्वेषपूर्ण कृत्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. रॅलीचे नेतृत्व केल्याच्या आरोपावरून त्यांनी माजी खासदार आणि समाजातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली. निदर्शने आणि जाहीर सभेनंतर संतप्त जमावाने जबरदस्तीने पोलिस ठाण्यात प्रवेश केला आणि उभ्या असलेल्या वाहनांची, फुलदाण्यांची आणि खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली होती. पोलिस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करून त्यांना मारहाण करण्यात आली.

Political News: मोठी बातमी! माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Political News: मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून ३५ जणांना अटक केली. व्हिडिओ फुटेजच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी २४ आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले. यापैकी १७ जणांना तुरुंगात पाठवण्यात आले, तर सात जण सध्या पोलिस कोठडीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खासदार कंकर मुंजारे यांनी सांगितले की, 'लाठीचार्ज झाल्याचे कळल्यानंतर मी किरणपूरला गेलो. मी पोहोचलो तेव्हा हिंसाचार थांबला होता. मी माझ्या लोकांसोबत सभेला गेलो आणि माझ्या गाडीत बसून भाषणे ऐकली. त्यानंतर मी सुद्धा मंचावर बोललो. मी किरणपूर पोलिस ठाण्यात जाऊन एका मिनिटात परत आलो. मी ना मोर्चाचे नेतृत्व केले ना आंदोलनात सहभागी झालो. पोलिसांना हवे असते तर, कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे बोलत आहे हे ठरवण्यासाठी ते मरी टोल ब्लॉक आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासू शकले असते. पीडितेचे पती त्या दिवशी बालाघाट शहरात काँग्रेस नेते जितू पटवारी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते.

Political News: मोठी बातमी! माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Poilitical Crisis News : पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान

किरणपूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेत अडथळा आणणाऱ्या दगडफेक, शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान या घटनांच्या प्रकरणात, दंगल घडवण्याचा कट रचला गेला होता का? या दृष्टिकोनातूनही पोलिस तपास करत आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांवरून असे सांगितले जात आहे की, दारू आणि पैसे वाटून जमाव जमवण्यात आला होता. दंगल झाल्यानंतरही दारू वाटण्यात आली. पोलिस सध्या दारू कंत्राटदार आणि दारू दुकानातील कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.

Political News: मोठी बातमी! माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Political News: माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, शिक्षक मंतदार संघ निवडणुकीत मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com