
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरू.
आर्थर रोड तुरुंगात त्याला १४ सुविधा देण्यात येणार आहेत.
वैद्यकीय, अन्न, स्वच्छ पाणी व टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देणार.
भारत सरकारने बेल्जियमहून प्रत्यार्पणासाठी औपचारिक मागणी केली आहे.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसीला भारतात आणण्यात येणार आहे. भारत सरकारने बेल्जियमहून त्याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केलीय. त्याला आर्थर रोड तुरुंगात वैद्यकीय, अन्न आणि सुरक्षा सुविधांची हमी देण्यात आलीय. पंजाब नॅशनल बँकेच्या १२,००० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणलं जाणार आहे.
बेल्जियमहून मेहुल चोक्सीला देशात आणण्यासाठी त्याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे. मेहुल चौकसी ठेवण्यात येणाऱ्या तुरुंगात अनेक सुविधा दिले जाणार आहेत. अन्न, २४ तास वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छ स्वच्छता यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. मेहुल चोक्सीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने बेल्जियम सरकारला एका पत्राद्वारे औपचारिक आश्वासने दिलीत. चोक्सीला भारतात आणले तर त्याला अमानुष वागणूक दिली जाणार नाही. त्याशिवाय त्याला मेडिकलसह १४ सुविधा पुरवल्या जातील, असं भारताने बेल्जियमला सांगण्यात आले आहे.
मेहुल चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील बॅरेक नंबर १२ मध्ये ठेवले जाणार आहे. या कोठडीत ६ लोकांच्या राहण्याची क्षमता आहे. पत्र पाठवेपर्यंत बॅरेकमधील २ कोठडी रिकामी करण्यात आली होती. उद्योगपती मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली होती. भारतीय तपास यंत्रणेच्या प्रत्यार्पणाच्या आवाहनानंतर १२ एप्रिलला चोक्सीला अटक झाली.
दरम्यान मेहुल चौक्सीला तुरुंगात काय सुविधा मिळतील ते जाणून घेऊ.
तुरुंगात २० बाय १५ ची स्वतंत्र कोठडी
कोठडीमध्ये अटॅच टॉयलेट आणि बाथरूम
३ वेळचे जेवण, स्वच्छ पाणी
झोपण्यासाठी कापसाची उशी, चादर आणि अंथरूण
कोर्टाच्या ऑर्डरवर मेटल अथवा लाकडाचा बेड
सीलिंग फॅन आणि लाईट
२४ तास सीसीटीव्ही
ताज्या हवेसाठी खुले अंगण
योग, मेडिटेशन आणि लायब्रेरी
मनोरंजनासाठी बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि कॅरम
२४ तास आरोग्य सुविधा
आपत्कालीन परिस्थितीत जे.जे हॉस्पिटलला सुविधा
कोर्टाच्या ऑर्डरवर घरातील जेवणाची परवानगी. त्याशिवाय जेलच्या कोठडीत ग्रीलच्या खिडक्या, वेंटिलेटर आणि सीलिंग फॅन असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.