

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींचा विरोधकांवर निशाणा
पीए मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला
तरुण स्टार्टअप्सचं मोदींकडून कौतुक
मी ५६ वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नसल्याचे म्हणत राहुल गांधीना टोला
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी पीएम मोदी यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना अर्थपूर्व चर्चेचे आवाहन केले. यावेळी पीएम मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'देशाला आणि संसदेला त्यांच्या अनुभवाची आणि ज्ञानाची गरज आहे. जिथे तथ्य आणि तर्क असतो. तिथे वादळाची गरज नसते. कुणीही शांतपणे आपली मतं मांडू शकतो.', असे पीएम मोदी यांनी वरोधकांना सांगितले.
यावेळी पीएम मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तरुणांच्या स्टार्टअप्सचे कौतुक करताना पीएम मोदी यांनी 'मी एका ५६ वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाही.', असा टोला राहुल गांधी यांना लगावला. यावेळी त्यांनी 'पावसाळा आणि पावसाळी अधिवेशन दोन्ही फलदायी असतात. दोन्ही फलदायी ठरल्यास सर्व जीवांचे कल्याण साधले जाते. देशाचे कल्याण साधले जाते.', असे देखील सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अंतराळ क्षेत्रातील एका मोठ्या कामगिरीवर बोलताना तरुणांचे कौतुक केले. त्यांनी हैदराबादमधील खासगी अंतराळ स्टार्टअप 'स्कायरूट एरोस्पेस'ने केलेले यशस्वी रॉकेट प्रक्षेपण हा भारतासाठी एक अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता विरोधी पक्षांना टोला लगावला. पीएम मोदी यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
पीएम मोदी यांनी सांगितले की, 'स्कायरूटचे यश हे कोणत्याही अनुभवी राजकीय व्यक्तीचे फळ नसून फक्त २८ वर्षांच्या तरुण अभियंत्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. मी एका ५६ वर्षीय व्यक्तीबद्दल बोलत नसून त्या तरुणांबद्दल बोलत आहेत ज्यांनी आपल्या कौशल्याने आणि नवनिर्मितीने भारताला एका नव्या उंचीवर नेले आहे.' पीएम मोदींचे हे वक्तव्य हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी एक प्रत्यक्ष टोला मानले जात आहे.
मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या आधी एक भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला होता. आताच एका तरुण भारतीय स्टार्टअप कंपनीने एक मोठे यश संपादन केले. जगातील फार कमी देशांनी असे धाडस दाखवले. भारताच्या तरुणांनी अंतराळात एक नवीन झेप घेतली. या स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी मला सांगण्यात की त्यांच्या संपूर्ण टीमचे सरासरी वय फक्त २८ वर्षे आहे. ऐवढ्या कमी वयात त्यांनी ही कामगिरी केली.' यावेळीच त्यांनी राहुल गांधींवर टीका केली की 'मी एका ५६ वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाहीये.' राहुल गांधींचा जन्म १९ जून १९७० रोजी झाला आणि म्हणूनच ते ५६ वर्षांचे आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.