भाजपची तामिळनाडूवर नजर; स्टॅलिन सरकारविरोधात PM मोदींनी दंड थोपटले, काय आहे फॉर्म्युला?

narendra modi news : भाजपने तामिळनाडूवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान मोदींनी स्टॅलिन सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.
Narendra modi News
PM Narendra modi Saam tv
Published On
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर

तामिळनाडूची डीएमके सरकारपासून सुटका करा, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर टीका

'तामिळनाडूतील लोकांना बदल हवाय. तामिळनाडूला डीएमके यांच्या कुशासनापासून सुटका हवी आहे. आम्हाला तामिळनाडू विकसित, सुरक्षित आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचं आहे. डीएमके सरकार जाण्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुक सरकारवर टीका केली. ते तामिळनाडूमध्ये बोलत होते.

Narendra modi News
ठरलं! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार; मुंबईचं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तामिळनाडूतील लोकांनी द्रमुक सरकारला दोन वेळा बहुमत दिलं आहे. परंतु जनेताशी विश्वासघात केला आहे. द्रमुक सरकारने अनेक आश्वासने दिली. परंतु कोणतीही कामे केली नाहीत. खरंतर डीएमके सरकारला लोक सीएमसी सरकार या नावाने बोलत आहे. या अर्थ करप्शन, माफिया आणि क्राइम याला प्रोत्साहन देणारं सरकार. तामिळनाडूतील जनता डीएमके आणि सीएमसी दोन्हीला मूळासकट उखडणार आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये डबल इंजिन सरकार होणार आहे'.

Narendra modi News
धक्कादायक! सांगलीत आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'तामिळनाडूच्या सरकारला लोकशाहीचं काही देणे-घेणे नाही. त्यांचं सरकार एकाच कुटुंबाची गुलामी करतंय. डीएमकेमध्ये कोणाला पुढे जायचं असेल, त्यांच्याकडे तीन मार्ग आहेत. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि गु्न्हे, या मार्गाने ते पुढे जात आहेत. डीएमकेमध्ये हेच लोक पुढे जात आहेत. यामुळे संपूर्ण राज्याचं नुकसान होत आहे. राज्यातील लहान मुलांनाही कळतंय की, राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. भ्रष्ट्राचाराच्या मार्गातून खिसे भरले जात आहेत'.

Narendra modi News
बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

'तामिळनाडूला देशाला समृद्ध केलं आहे. या राज्यामुळे देशाचा गौरव होतो. भारत देश विकसित होण्याच्या मार्गाने पुढे जात आहेत. या काळात तामिळनाडूला डीएमकेच्या जाळ्यातून सोडवावे लागेल. तामिळनाडूची सुटका होईल, तेव्हा वेगाने भारताचा विकास होईल, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com