PM मोदींच्या आवाहनाला मंत्र्यांचा ठेंगा; मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कधी कमी होणार?

PM Modi fuel saving : पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेल वाचवण्याचं आवाहन केले, पण त्यांच्याच मंत्र्यांनी या आवाहनाकडे पाठ फिरवलीय...एकीकडे मोदींनी स्वतःचा ताफा कमी केलेला असतानाच दुसरीकडे राज्याच्या मंत्र्यांच्य़ा ताफ्यातील गाड्या कधी कमी होणार? राज्यात मोंदीच्या आवाहनाकडे कसं दुर्लक्ष केलं जातयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
pm narendra modi news update
pm narendra modi news Saam tv
Published On

मिताली मठकर

ही दृश्य नीट पाहा..... पंतप्रधान मोदींनी जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचं, सार्वजनिक वाहनं वापरण्याचं एवढंच नाही तर वर्क फ्रॉम होमचं आवाहन केलंय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील मंत्र्यांना ताफ्यातील गाड्या कमी करण्याचं आवाहन केलंय. मात्र राज्यातील मंत्र्यांनी या आवाहनाला ठेंगा दाखवलाय.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यात तब्बल १२ गाड्या असल्याचं दिसून आलंय. रायगडच्या भरडखोल जेट्टीच्या उद्घाटना वेळी राणे यांच्या ताफ्यात १२ गाड्या होत्या. मलबार हिल परिसरातून मंत्रालयाकडे जाताना वनमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्यात ६ गाड्या असल्याचं आढळून आल्या आहेत.

pm narendra modi news update
PM मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे ६ मोठे निर्णय; मंत्री-अधिकाऱ्यांसाठी आदेशच काढले

एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना Z प्लस सुरक्षा असल्यानं १५ गाड्यांचा ताफा देण्यात आलाय. मात्र ठाण्याहून मुंबईकडे जाताना शिंदेंच्या ताफ्यात केवळ ८ गाड्या असल्याचं समोर आलंय. मोदींच्या आवाहनानंतर शिंदेंनी आपल्या ताफ्यातील ७ गाड्या कमी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यात विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वतःसाठी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात केली असली तरी ताफ्यातील तब्बल ७ गाड्या पेट्रोल आणि डिझेलच्या असल्याचं समोर आलंय.

दुसरीकडे शिंदेसेनेचे मंत्री आशिष जयस्वाल यांच्यात ताफ्यात तीन गाड्या असल्याचं आढळून आलंय. खरंतर मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या वेगवेगळी दिसतेय. त्यामुळं साम टीव्हीने मंत्र्यांच्या ताफ्यात किती शासकीय गाड्या असतात याची माहिती घेतली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा असते. त्यामुळे त्यांच्या ताफ्यात १५ गाड्या असतात. तर चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना झेड सुरक्षा असल्यानं त्यांच्या ताफ्यात स्वतःची एक आणि २ पोलिसांच्या गाड्या असतात. तर त्यांच्या खात्याची एक अशा ४ गाड्या असतात. बाकी इतर सर्व कॅबिनेट मंत्र्यांना वाय प्लस सुरक्षा असल्यानं एक स्वतःची, एक पोलीस सुरक्षा आणि एक विभागाची गाडी असते. तर राज्यमंत्र्यांना वाय सुरक्षा असते. त्यामुळे त्यांच्या ताफ्यात एक मंत्र्याची आणि एक पोलिसांची गाडी असते.

pm narendra modi news update
PM Modi Convoy Size : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय, ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी

दुसरीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेले आमदार अमित साटम यांनी मोदींच्या आवाहनानंतर २५ गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाईची पाहणी केली. हे कमी होतं की काय? मध्य प्रदेशाच्या पाठ्य पुस्तक निगम मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर भाजप नेते सौभाग्यसिंह ठाकूर यांनी तर हद्दच पार केली. तब्बल 500 गाड्यांचा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन केलं.

देशाला आवाहन केल्यानंतर खुद्द पंतप्रधानांनी त्याची अंमलबजावणी करत स्वत:च्या ताफ्यात फक्त 2 गाड्या ठेवल्याचं समोर आलयं..मात्र भाजपचे काही नेते,मंत्रीच जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठेंगा दाखवत असतील तर त्याच्यावर कारवाई होणार का? आपल्या ताफ्यात 10,12 गाड्या घेऊन फिरणाऱ्या या मंत्र्यांना चाप लावण्यासाठी सरकार थेट निर्बंध घालणार का? याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com