PM मोदींचा महिलेसोबतचा फोटो केला शेअर; उच्च न्यायालयाची अभिजीत दीपकेंसह CJPच्या कार्यकर्त्यांना नोटीस

PM Modi Morphed Photo Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एका महिलेच्या कथित मॉर्फ फोटो प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने CJPशी संबंधित काही व्यक्तींना नोटीस बजावली आहे.
PM Modi Morphed Photo Controversy
Delhi High Court Notice To Cjp Leaders Over Alleged Morphed Pm Modi Photosaam tv
Published On: 
Summary
  • पंतप्रधान मोदींच्या मॉर्फ फोटो प्रकरणात दिल्ली हायकोर्टाची नोटीस

  • अभिजीत दीपके यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात प्रकरण

  • कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हायकोर्टाची नोटीस

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मागणाऱ्या अभिजीत दीपके अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 'कॉक्रोच जनता पार्टी'चे नेते सौरभ दास, अभिजित दीपके, आशुतोष रंका आणि रत्ना सिंह यांना नोटिसा बजावल्या आहेत. पंतप्रधान आणि एका महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालयाने 'मेटा'ला अशा सर्व फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती गिरीश काठपालिया यांनी नमूद केले की, ही एक असाधारण परिस्थिती आहे. कारण हे प्रकरण केवळ एका महिलेशीच नव्हे, तर देशाच्या पंतप्रधानांशीही संबंधित आहे. जर दिल्ली पोलीस या प्रकरणाबाबत संवेदनशील नसतील, तर ते त्यांनी संवेदनशील बनावं असं न्यायालय त्यांना सांगेल, असंही न्यायमूर्ती म्हणालेत.

याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील उमेश शर्मा यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा विशेष उल्लेख करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. यासंदर्भात आधीच एफआयआर (FIR) दाखल करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. खंडपीठाने सुनावणी करताना जबाबदार लोकांना पकडणं किंवा व्हायरल डीपफेक लिंकला तात्काळ हटवण्याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. उच्च न्यायालयाने पोलिसांना पीडितेला पूर्ण सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्या महिलेने न्यायालयाला कळवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com