मोदींचा व्हिडीओ मेसेज, सोनम वागंचुकांनी उपोषण सोडलं; पण जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच, मध्यरात्री नेमकं काय काय घडलं?

Sonam Wangchuk ends hunger strike latest news :सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनंतर उपोषण मागे घेतले असले तरी जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच आहे. आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
Union Ministers JP Nadda and Sonam Wangchuk
Sonam Wangchuksaam tv
Published On

Jantar Mantar student protest today : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानं तणाव काहीसा निवळला आहे.मात्र त्यांनी उपोषण सोडण्याआधी काय घडलं? तसंच पंतप्रधान मोदींनी तरुणांना या संवेदनशील विषयाचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी जंतर-मंतरवरील आंदोलन अद्याप सुरूच आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही जंतर-मंतरवर जमलेला जमाव आंदोलनावर ठाम आहे. रात्रभर नेमकं काय झालं? आंदोलनाचं काय होणार? सरकारची भूमिका काय?

पंतप्रधानांचे आवाहन व आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री एक व्हिडीओ पोस्ट करत देशातील तरूणांना आवाहन केले आणि एक अश्वासन दिले. या संवेदनशील विषयाचे राजकारण न करण्याचे आवाहन तरुणांना केले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ देणार नाही, असे सांगत सोमवारी संसदेत चर्चा, कॅबिनेट बैठक आणि कायदा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

विद्यार्थी आंदोलनावर ठाम

'नीट' (NEET) पेपर फुटीची घटना घडून दोन महिने झाले तरी कारवाई का झाली नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुटले असले तरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक अजूनही ठाम असून जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच आहे.

Union Ministers JP Nadda and Sonam Wangchuk
Today's Horoscope : 'विठूमाऊलीची' अथांग कृपा! आज ६ राशींचे नशीब उजळणार; होणार धनलाभ, तुमच्या भाग्यात आज काय?

२६ व्या दिवशी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं -

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ व्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. गुरुवारी मध्यरात्री 'मेदांता' रुग्णालयात केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना ज्यूस पाजला. पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २४ दिवसांपासून सोनम वांगचुक बेमुदत उपोषणावर होते . विविध राजकीय पक्षांचे आणि ६५ खासदारांनी सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. देशात संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी तसेच सकारात्मक चर्चेचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेत असल्याचे सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया (X) वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक माफियाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण जाहीर केलं. फास्ट ट्रॅक कोर्टसह कठोर शिक्षेचा मसुदा त्यांनी तयार केलेला आहे. यावर मंत्रिमंडळातर चर्चा देखील होणार आहे, अशी माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असं देखील मोदींनी स्पष्ट केलं.

फास्ट ट्रॅक कोर्टसाठी मी विभागांना निर्देश दिले होते. आज विभागांनी सतत मेहनत करून काल उशिरा रात्री माझ्याकडे मसुदाही सोपवला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींसह असलेल्या या मसुद्यावर उद्या कॅबिनेटमध्ये (मंत्रिमंडळात) चर्चा होईल. कॅबिनेटमधील सहकाऱ्यांच्या सूचनेनंतर त्याला अंतिम रूप दिले जाईल. आणि सोमवारपासून संसदेचे दुसरे आठवडा सत्र सुरू होत आहे, तेव्हा लवकरात लवकर हे विधेयक सभागृहात मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मोदी म्हणाले.

Union Ministers JP Nadda and Sonam Wangchuk
पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

अभिजित दीपके काय म्हणाले ?

सोनम सरांनी २६ दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले, याबद्दल आम्हाला मनापासून दिलासा मिळाला आहे आणि आम्ही अत्यंत आभारी आहोत. सर, तुमच्या अतुलनीय शौर्याबद्दल आणि त्यागाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार! स्वतःचा जीव पणाला लावून तुम्ही संपूर्ण देशाच्या विवेकबुद्धीला जागे केले. तुमचा जीव या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे. कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत असेच सुरू राहील.

CJP चं देशव्यापी आंदोलन -

CJP कडून आज देशभरात, गावागावांत आणि शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय काहीही मंजूर नाही, अशी मुख्य मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. विविध गावांमधून आणि शहरांमधून आलेल्या लोकांना आपल्या नातेवाईक व मित्रांसोबत एकत्र येऊन पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने प्रदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Union Ministers JP Nadda and Sonam Wangchuk
दिल्लीत आंदोलन भडकले! लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर, अनेक विद्यार्थी बेशुद्ध; संसदेच्या दारात पोलिसांचा बळाचा वापर

मध्यरात्री नेमकं काय काय घडलं?

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी त्यांच्या उपोषण सोडण्याच्या आधी १२ वाजताच्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ जारी केला. त्यानंतर रात्री दीड वाजताचा सुमारास सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर २ वाजताच्या आसपास अभिजित दीपकेंनीही व्हिडीओ पोस्ट करत जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com