Pm Modi Kashmir Visit: PM मोदींनी केले 'Wed in India'चे आवाहन, काय आहे यामागचं कारण?

Pm Narendra Modi Shreenagar Visit: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यातच आज पंतप्रधान श्रीनगरमध्ये आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.
Pm Narendra Modi Shreenagar Visit
Pm Narendra Modi Shreenagar VisitSaam Tv
Published On

Pm Modi On Wed In India:

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यातच आज पंतप्रधान श्रीनगरमध्ये आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. याचदरम्यान पंतप्रधानांनी गुरुवारी श्रीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले की, ''जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नाही, तर हे भारताचे मुकुट आहे. उंचावलेली मान विकास आणि आदराचे प्रतीक आहे. विकसित जम्मू-काश्मीर हे विकसित भारताचे प्राधान्य आहे.''

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ;''जम्मू-काश्मीरमध्ये जी 20 चे आयोजन कशा प्रकारे करण्यात आलं, हे संपूर्ण जगानं पाहिलं. चांगले हेतू आणि संकल्प पूर्ण करण्याची तळमळ हे उद्दिष्ट साध्य करते. एकट्या 2023 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 2 कोटीहून अधिक पर्यटक आले.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Narendra Modi Shreenagar Visit
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचे काम कुठपर्यंत आलं? मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा

ते म्हणाले, "श्रीनगरच्या तलावांमध्ये सर्वत्र कमळ दिसत आहे. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या लोगोमध्येही कमळ आहे. हा आनंदाचा योगायोग आहे की, निर्सगाचा काही इशारा की, भाजपचे चिन्ह देखील आहे. कमळ आणि जम्मू-काश्मीरचं एक वेगळं नातं आहे."  (Latest Marathi News)

गुरुवारी श्रीनगरमध्ये 'विकसित भारत, विकसित जम्मू आणि काश्मीर' कार्यक्रमात 'वेड इन इंडिया' या त्यांच्या मिशनबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जे डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखत आहेत ते काश्मीरचा पर्यायही निवडू शकतात. त्यांनी भारतीय नागरिकांना परदेशात लग्न करणे टाळण्याचे आवाहन केले.

Pm Narendra Modi Shreenagar Visit
Kalyan News: कल्याणमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! बनावट देशी दारूच्या 48 हजार बाटल्या केल्या जप्त

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचं कारण काय?

पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरला वेडिंग डेस्टिनेशन बनवण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनामागे एक खास कारण आहे. पंतप्रधान मोदींना भारतातील पारंपारिक उपक्रमांना पर्यटनाशी जोडून पर्यटनस्थळांच्या विकासाला गती द्यायची आहे, असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com