Kalyan News: कल्याणमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! बनावट देशी दारूच्या 48 हजार बाटल्या केल्या जप्त

Kalyan Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाने कल्याणमध्ये आज सकाळच्या सुमारास बनावट देशी दारूच्या 48 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कल्याणमध्ये आज सकाळच्या सुमारास बनावट देशी दारूच्या 48 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. एका ट्रकमध्ये बनावट देशी दारूच्या साठ्याचे वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या पथकाने कल्याण सुभाष चौक परिसरात सापळा रचत हा साठा जप्त केलाय.

बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या साईनाथ रामगिरवार, अमरदीप फुलझेले या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाटलांवर नगर जिल्ह्यातील देशी दारू बनवणाऱ्या एका नामांकित कंपनीचे लेबल लावण्यात आले होते. या दोघांनी दारूचा साठा कुठून आणला व ते कुठे घेऊन जाणार होते, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक करत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News
Shivsena MLA Disqualification: शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का! आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण मुरबाड रोड वरून येणाऱ्या एका ट्रकमध्ये बनावट दारूचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाने कल्याण मुरबाड रोड परिसरात सापळा रचला.  (Latest Marathi News)

सुभाष चौक परिसरात हा ट्रक दिसताच राज उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 18 थांबवला तपासणी केली असता ट्रकमध्ये बनावट देशी दारूचा साठा आढळून आला. तसेच 48 हजार 400 बाटल्या या ट्रकमध्ये होत्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तत्काळ ट्रक मधील साईनाथ रामगिरवार, अमरदीप फुलझेले या दोघांना ताब्यात घेतले. बनावट देशी दारूचा साठा देखील जप्त केलाय.

या दारूचा बाटल्यावर नगर जिल्ह्यातील एका नामांकित कंपनीचे लेबल लावण्यात आले होते. हा साठा या दोघांनी कुठून आणला होता व कुठे घेऊन जाणार होते, कुणाला विक्री करणार होते, याचा शोध आता राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com