Shivsena MLA Disqualification: शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का! आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार

Supreme Court On Shivsena Mla Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता.
Shivsena MLA Disqualification
Shivsena MLA DisqualificationSaamtv
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. ७ मार्च २०२४

Shivsena MLA Disqualification Case:

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता. आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीत कोर्टाने खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमताच्या चाचणीवर अवलंबून राहणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाही का? असा थेट सवाल करत नार्वेकरांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आजच्या सुनावणीत काय घडलं?

आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी "नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यावर लवकर सुनावणी झाली पाहिजे, नाहीतर प्रकरण निरस्त ठरेल. अशी विनंती कोर्टाला केली. तसेच ध्यक्षांनी तुमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला आहे," असेही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

तर शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष यांच्यकडे दाखल केलेली कागदपत्रे आणि कोर्टात दाखल केलेली कागदपत्र यात तफावत आहे. हा फक्त एक मुद्दा आहे असे अनेक मुद्दे आहेत, असा दावा केला. यावर सरन्यायाधिशांनी आमच्या निकालपत्रात जे लिहिलेलं त्याविरोधात निर्णय नाही झालाय का? असा थेट सवाल साळवेंना विचारला.

Shivsena MLA Disqualification
Chandrapur : ईव्हीएम हटाव; लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, चंद्रपूरमध्ये माेर्चा

निकाल सुप्रीम कोर्टात होणार..

तसेच "खरा पक्ष कोणता पक्ष आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येते ? हे निकालाच्या विरोधात नाही का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १ एप्रिलच्या आत विधानसभा अध्यक्ष यांच्याकडील सर्व कागदपत्र सुप्रीम कोर्टाने मागितली आहेत.

पुढील सुनावणी कधी?

८ एप्रिलला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी, अशी शिंदेगटाची महत्वाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राहुल नार्वेकरांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

Shivsena MLA Disqualification
BJP March: भाजप नगरसेवक अरविंद शेट्टींवर गुन्हा दाखल; आक्रमक कार्यकर्त्यांची काशीमिरा पोलीस ठाण्यावर धडक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com