मुंबईतील वरळी (Worli) भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली आहे. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला.
मुंबईकरांच्या (Mumbai) आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं (Maharshtra Politics) आहे.
मुख्यमंत्र्यांनी साधला रुग्णांशी संवाद
वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात (Apala Hospital) मुख्यमंत्र्यांचं सकाळी अचानक आगमन झालं. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपल्या दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी, या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आला (CM Eknath Shinde News) आहे. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत.
झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी सुरू होणार
मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (CM Shinde Visit) आहे.
यावेळी मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.