BJP March: भाजप नगरसेवक अरविंद शेट्टींवर गुन्हा दाखल; आक्रमक कार्यकर्त्यांची काशीमिरा पोलीस ठाण्यावर धडक

Case Against BJP Corporator Arvind Shetty: दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BJP March
BJP MarchSaam Tv

Maharashtra Politics News

दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांचा एक व्हिडिओ वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात गंभीर आरोप केले (BJP March) होते. आता भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी (Arvind Shetty) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विरोधात काशीमिरा पोलीस ठाण्यावर भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे. (Latest Political News)

भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला (Politics News) आहे. त्या विरोधात माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप

शेट्टी यांच्यावर सरनाईक यांच्या दबावाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी योगेश काळेला निलंबित करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली (Case Against BJP Corporator Arvind Shetty) आहे. काशीमिरा पोलीस ठाण्यात अरविंद शेट्टी आणि संतोष पुत्रण यांच्या विरोधात ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेट्टी यांचे पार्टनर संतोष पुत्रण यांच्या मालकीचं मिरारोडमध्ये हॉटेल आहे.

प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी दबाव टाकून ते हॉटेल विकत मागितलं, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. पुत्रण यांनी हॉटेल देण्यास नकार दिल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

BJP March
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित; ठाकरे गट २०, काँग्रेस २०, शरद पवार गट ८ जागा लढणार?

भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

सरनाईक यांच्या दबावाखाली एमएमआरडीएने रस्ता तयार केला आहे. त्यांच्या हॉटेलसमोर जबरदस्तीने भिंत उभारली जात आहे. त्यामुळे त्यांच्या हॉटेलकडे जाण्याचा रस्ता बंद असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला (Arvind Shetty Against Pratap Sarnaik) होता. मंगळवारी शेट्टी आणि संतोष पुत्रण यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

अरविंद शेट्टी यांच्याविरोधात दाखल केलेली एफआयआर बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक नरेंद्र मेहता यांनी केला (Maharashtra Politics News) आहे. त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

BJP March
Political News: 'ज्या घरात मोदींचा फोटो पोहोचला, ते घर गरीब झाले', मल्लिकार्जुन खरगे यांची PM मोदींवर टीका; VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com