Amravati News: आमदार बच्चू कडू समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, अमरावतीच्या चांदूरबाजार येथील घटना

Bachchu Kadu Prahar Party BJP Workers Clash: अमरावतीतून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप व बच्चू कडू यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.
Bachchu Kadu Prahar Party BJP Workers Clash
Bachchu Kadu Prahar Party BJP Workers ClashSaam Tv
Published On

Amar Ghatare

Maharashtra Politics News

अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे मजुरांना साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजप व बच्चू कडू यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते, तर राजकीय फायदा घेण्यासाठी ह्या कर्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. (Latest Political News)

अमरावती येथील चांदूर बाजारमध्ये आमदार बच्चू कडू यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे बराच वेळ गदारोळ झाला. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचल्यानंतरही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकायला तयार (Clash Bachchu Kadu Prahar Party And BJP Workers) नव्हते. कसंबसं पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत करून कार्यक्रमात अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बच्चू कडू यांचे बॅनर फाडले

भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडून टाकले. बॅनर फाडल्यामुळं प्रहार पक्षाचे आमदार कार्यकर्ते संतापले. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी त्यांना शांत केलं. बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे मजुरांना साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कामगारांना उन्हात उभं केलं गेलं, तसेच या ठिकाणी पिण्याची पाण्याचीही व्यवस्था नव्हती, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. गैरकारभाराचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी (BJP Workers) आमदार बच्चू कडू यांचे बॅनर उखडून फेकून दिले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

घटनास्थळी पोलिसांची धाव

यावेळी कार्यक्रमात भाजपचे (BJP) नेते व माजी नगरसेवक गोपाल तीरमारे यांनी प्रहार कार्यकर्त्याशी वाद घातला. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी (Maharashtra Politics) केली. तर यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आयोजकांनी राड्यानंतर कार्यक्रम पुढं ढकलला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com