Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Plane Accident In Iran: इराणमध्ये टेकऑफ घेतलेल्या विमानाचा अचानक टायर फाटला त्यानंतर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. प्रवासी प्रचंड घाबरले आणि प्रार्थना करू लागले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Plane Accident:Saam Tv
Published On
  • इराणमध्ये टेकऑफनंतर विमानाचा टायर फाटला

  • बोईंग 737 चे मशहद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

  • सेपहरान एअरलाइन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड

  • इराण विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगचा थरारक व्हिडीओ समोर

इराणमध्ये मोठा विमान अपघात होता होता टळला. इराण एअरलाइन्सच्या सेपहरान विमानातील प्रवाशांसोबत भयंकर घडलं. विमानात अचानक बिघाड झाला त्यामुळे त्याला यू-टर्न घेऊन मशहदकडे परत यावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचा एक टायर फाटला आणि निखळून पडला. त्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि विमानातील प्रवाशांना झटका बसला.

हे विमान ईशान्य इराणमधील मशहद येथून केरमानशाहसाठी निघाले होते. पण उड्डाण घेताच विमानात तांत्रिक बिघाड झाला. चाक निखळल्यानंतर पाटलटने प्रवाशांना बिघाड झाल्याची माहिती दिली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवासी प्रचंड घाबरले. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हवेच्या तीव्र झोतामुळे विमानातील प्रवाशांना जोरदार हादरा बसला ज्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या कंपनांचा परिणाम केबिनच्या आतील भागावर झाला ज्यामुळे प्रवाशांच्या डोक्यावरील सामानाचे कप्पे उघडले आणि प्रवाशांच्या वैयक्तिक वस्तू- बॅग सीटवर आणि कॉरिडॉरमध्ये खाली पडल्या. या सर्व वस्तू अंगावर पडल्यामुळे काही प्रवासी जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये प्रवासी प्रार्थना करताना आणि ओरडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडिओ विमान विमानतळावर परत येत असतानाचे आहेत.

विमानात बिघाड झाल्याचे कळाल्यानंतर मशहद विमानतळावर सर्व आवश्यक तयारी अगोदरच करण्यात आली होती ज्यानंतर बोईंग ७३७ विमानाने सुरक्षित लँडिंग केले. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत कोणताही प्रवासी किंवा कर्मचारी गंभीर जखमी झाला नाही. विमानाचे मशहद विमानतळावर सुरक्षित लँडिग केल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक प्रवासी रडत होते तर काही प्रवासी जीव मुठीत धरून प्रार्थना करत होते. एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या घटनेबाबत सविस्तर निवेदन जारी केलेले नाही. विमान वाहतूक अधिकारी विमानाची तपासणी करून टायर निकामी होण्याचा संबंध इंजिनच्या बिघाडाशी होता का? याचा तपास करत आहे.

Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Plane Accident : भीषण अपघात! विमान धावपट्टीवरून घसरलं, क्षणात पेट घेतला; ५ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com