Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV

Petrol Diesel Price : गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त, महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय? जाणून घ्या...

पेट्रोल डिझेलच्या किंमती कच्चा तेलाच्या दरावर आधारभूत असतात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.
Published on

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या किंमती कच्चा तेलाच्या दरावर आधारभूत असतात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 95.36 पर्यंत घसरली आहे, तर WTI ची किंमत प्रति बॅरल $ 87.82 पर्यंत घसरली आहे. दरम्यान, देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. (Petrol Diesel Price Latest News)

Petrol Diesel Price Today
Supreme Court : केंद्र सरकारला नोटाबंदी करण्याचा अधिकार आहे का? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार, आज काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (Diesel)  दरात वाढ करण्यात आली आहे. बिहारमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. बिहारमध्ये पेट्रोल 109.66 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 96.28 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

उत्तर प्रदेशातही इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. उत्तरप्रदेशात पेट्रोलचे दर 96.49 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.66 रुपये झाले आहे. याशिवाय राजस्थानमध्येही दरात वाढ झाली असून, पेट्रोल 108.20 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.47 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Petrol Diesel Price Today
Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी नेपाळ हादरले; दिल्लीसह ८ राज्यांमध्येही जाणवले धक्के, ६ जणांचा मृत्यू

दुसरीकडे, गुजरात, मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये किमतीत किंचित घट झाली आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात 2 ते 3 रुपयांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com