Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी नेपाळ हादरले; दिल्लीसह ८ राज्यांमध्येही जाणवले धक्के, ६ जणांचा मृत्यू

बुधवारी रात्री झालेल्या या भूकंपाची (Earthquake) तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती.
Earthquake
Earthquake Saam Tv
Published On

Earthquake : नेपाळमध्ये बुधवारी भल्यापहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपामुळे धोती जिल्ह्यात घर कोसळून झालेल्या अपघातात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. बुधवारी रात्री झालेल्या या भूकंपाची (Earthquake) तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातही या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

Earthquake
Supreme Court : केंद्र सरकारला नोटाबंदी करण्याचा अधिकार आहे का? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

नेपाळच्या सीमेवर उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली. तब्बल दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले.

याआधी सुद्धा नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. तर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास नेपाळमध्ये पुन्हा 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 6 जणांना आपला जीव गमावावा लागला.

Earthquake
Police Recruitment : आनंदाची बातमी! राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू; आजपासून भरता येईल ऑनलाईन अर्ज

दरम्यान, नेपाळमध्ये झालेल्या या भूकंपाचे तीव्र धक्के राजधानी दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतालाही जाणवले. उत्तर प्रदेशातील लखनौ, मुरादाबाद, मेरठ, बरेली शहर भूकंपाने हादरले. अचानक हादरले बसल्याने अनेक लोक घराबाहेर पडले. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्याचं समोर आलेलं नाही.

याआधी सुद्धा मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लखनौसहित उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल असल्याचं सांगितलं जात आहे. अचानक भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com