Iran Train Derailed: पॅसेंजर ट्रेन रुळावरुन घसरली; 17 प्रवासी ठार, 50 जखमी

आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
train derailed in eastern iran
train derailed in eastern iransaam tv

तेहरान (Mashhad-Yazd Passenger Train) : पूर्व इराण (eastern Iran) येथे एक पॅसेंजर ट्रेन (passenger train) रुळावरून घसरल्याने 17 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. या अपघातात 50 हून अधिक प्रवासी जखमी (injured) झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील (accident) मृतांचा आकडा वाढण्याची भीती इराणच्या शासकीय दूरचित्रवाणीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (iran train derailed latest marathi news)

इराण (iran) मधील तबास या शहराजवळ आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास रेल्वेचे सात पैकी चार डबे रुळावरून घसरले. हा अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. या अपघातामधील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

train derailed in eastern iran
CWG: संघातून वगळल्याने न्यायालयात धाव घेतलेली दिया चितळे करणार देशाचे प्रतिनिधित्व

ही दुर्घटना राजधानी तेहरानपासून सुमारे 550 किलोमीटर अंतरावर असलेल्या तबास शहर आणि यझद शहराच्या मध्यवर्ती घडला आहे. या अपघाताचा तपास सुरू आहे. यापूर्वी सन 2016 मध्ये मोठा रेल्वे अपघात झाला होता. यामध्ये 40 हून अधिक जण जखमी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

train derailed in eastern iran
Bhiwandi Fire : भिवंडीत प्लास्टिकचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
train derailed in eastern iran
सोशल मीडिया 'किंग' कोहलीने गाठला इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विराट आकडा
train derailed in eastern iran
'ग्रीन रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा पाठींबा, पुढाऱ्यांच्या स्टंटबाजीस चाेख प्रत्युत्तर देऊ'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com