

Punjab Crime News: पंजाब पोलिसांच्या एका एएसआय अधिकाऱ्याने पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील गुरूदासपूर येथे हा भयंकर प्रकार घडला आहे. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर त्याने आपल्या पाळीव कुत्र्यालाही मारले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरदासपूरच्या तिब्बड भागात पोलिस अधिकाऱ्याने स्वत:च्याच सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:च्या पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची भीषण घटना समोर आली आहे. भुपिंदर सिंग असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय पंजाब (Panjab) पोलिस एएसआय भूपिंदर सिंग यांनी गुरुदासपूरच्या भुंबली गावात त्यांची ४० वर्षीय पत्नी बलजीत कौर यांच्यावर गोळ्या झाडल्या.
त्याचबरोबर आरोपीने त्याचा १९ वर्षांचा मुलगा बलप्रीत सिंह याच्यावरही गोळ्या झाडल्या आहेत. एएसआयने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने पत्नीला ३ आणि मुलाला ६ गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान आरोपीने घरात असलेल्या पाळीव श्वानावरही गोळी झाडली यात त्या श्वानाचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आई आणि मुलाचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. आरोपी एएसआय भूपिंदर सिंग सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 'पत्नी, मुलगा आणि कुत्र्याची हत्या केल्यानंतर आरोपी एएसआय घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (Crime News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.