Uddhav thackeray Vs Devendra Fadnavis: भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला 'फडतूस' शब्दाचा अर्थ, म्हणाले...

Latest Marathi News : उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता फडतूस या शब्दावरुन भाजप आक्रमक झाली आहे. फडतूस या शब्दाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Uddhav thackeray Vs Devendra Fadnavis
Uddhav thackeray Vs Devendra FadnavisSaam Tv
Published On

Uddhav thackeray Vs Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फडतूस असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता फडतूस या शब्दावरुन भाजप आक्रमक झाली आहे. फडतूस या शब्दाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशामध्ये आता भाजप नेत्यांनीच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत त्यांना फडतूस या शब्दाचा अर्थ समजून सांगितला आहे.

Uddhav thackeray Vs Devendra Fadnavis
Maharashtra Political News: सोन्याच्या चमच्यात बदामाचं ज्यूस पिऊन मोठे झाले; फडणवीसांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

भाजपचे आमदार राम कदम (BJP MP Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी तर उद्धव ठाकरेंना घरकोंबड्या म्हणत त्यांनी केलेल्या फडतूसपणाची आठवण देखील करुन दिली. राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'उद्धव ठाकरे यांना फडतूस या शब्दाचा अर्थ कदाचित माहीत नसावा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दुष्मनांची गळाभेट करणारे हे स्वतः याचमुळे यांच्या घरातील नोकर चाकर, मंत्री आमदार, रक्ताचे नातेवाईक सगळे यांना सोडून गेलेत.'

तसंच, 'कधी तरी असा मुख्यमंत्री पहिला जो अडीच वर्षे मुख्यमंत्री होता पण पाच वेळा तरी तासाभरात मंत्रालयात गेला. घर कोंबड्यासारखे अडीच वर्षे घरात बसून होता याला फडतूस म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांनी जी मदत केली होती ती आपण बंद केली यालाच फडतूसपणा म्हणतात.', असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.

Uddhav thackeray Vs Devendra Fadnavis
Raigad Lubricant Plant : महाराष्ट्रातील रायगडमध्ये मोठा प्रकल्प, ९०० कोटींची गुंतवणूक; हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार

तर, भाजप आमदार नितेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते असे म्हणाले की, 'ज्या क्षणी महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचे संरक्षण कमी करेल. त्या क्षणांपासून ते घराच्या बाहेर निघणार नाहीत. मच्छर मारायची हिंमत नसलेल्यानी आमच्या देवेंद्रजींना फडतूस बोलायची हिम्मत करू नये. तसंच लायकीप्रमाणे बोलायचं.', अशा शब्दात त्यांनी टीका केली.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. त्यांनी तर उद्धव ठाकरेंची लायकी काढली. माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड म्हणाले, 'जो सत्तेच्या बाहेर पडतो तो वाचाळवीर होतो. ज्यांची लायकी नाही आणि मुख्यमंत्री झाले आणि ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही.'

Uddhav thackeray Vs Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News: नेमकं फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

दरम्यान, ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना माराहण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका तर केली. त्याचसोबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस असल्याचे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला, या शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, 'लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री, नुसती फडणवीसी करणारा व्यक्ती गृहमंत्री म्हणून मिरवत आहे. फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आले की लगेच एसआयटी नेमली जाते. गुंडागर्दीचं राज्य सुरु आहे.', या शब्दात त्यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com