Earthquake in Delhi : दिल्लीत पुन्हा भूकंप; 7 दिवसांत तिसऱ्यांना जमीन थरथरली

Delhi Earthquake update : दिल्लीत पुन्हा भूकंप झालाय. दिल्लीत 7 दिवसांत तिसऱ्यांना जमीन थरथरली आहे. मात्र, सौम्य स्वरुपाच्या भूकंपाच्या धक्क्याने कोणतंही मोठं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे.
Earthquake
Earthquake in DelhiSaam tv
Published On

दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाने हादरली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हे दक्षिण पूर्व दिल्ली होते. दिल्ली-एनसीआर सात दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. भूकंपाच्या धक्क्यानंतर दिल्लीकरांमध्ये एकच भीती पसरल्याची दिसून आली.

एका दिवसाआधी गाझियाबादमध्ये सौम्य स्वरुपाच्या तीव्रतेचा भूकंप झाला. मागील सोमवारी धौला विहिरीजवळ ४ तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपामुळे संपूर्ण एनसीआरमधील लोक घाबरल्याची माहिती मिळत आहे.

Earthquake
Earthquake : तिबेटमध्ये भूकंपाने हाहाकार, ३२ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, इमारती कोसळल्या, रस्ते खचले, VIDEO

मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून सूचना मिळाल्यानंतर, सोमवारी ११.४६ वाजता राजधानी दिल्ली हलक्या स्वरुपाच्या भूकंपाने हादरली. दिल्लीतील हा भूकंपाचा धक्का २.२ रिश्टर स्केलचा होता. २.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का हा सौम्य स्वरुपाचा असतो. या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण पूर्व दिल्लीत होता. भूकंपामुळे जमिनीपासून १० किलोमीटर खोलवर हालचाल झाली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतंही मोठं नुकसान झाल्याची शक्यता कमी आहे.

Earthquake
Delhi CM Rekha Gupta Oath : रेखा गुप्तांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात कोण कोण?

गेल्या सात दिवसांत तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबादमध्ये जमीन हादरली. आज सकाळी ५.३६ वाजता भूकंपाच्या हादऱ्यामुळे बहुतांश जणांची झोपमोड झाली. भूकंपामुळे लोक घाबरून घराबाहेर आले.

Earthquake
Delhi CM Rekha Gupta : दिल्लीची कमान महिलेच्या हाती, मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब

एक दिवसाआधी गाझियाबादमध्ये भूकंपाच्या धक्क्याने लोकांमध्ये एकच भीती पसरली होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने अनेकांना भूकंपाची जाणीव देखील झाली नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजून २४ मिनिटाला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com