Delhi CM Rekha Gupta : दिल्लीची कमान महिलेच्या हाती, मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Delhi new Chief Minister : दिल्लीची कमान महिलेच्या हाती असणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
 Rekha Gupta news
Delhi CM Rekha GuptaSaam tv
Published On

दिल्लीकरांना अखेर नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. दिल्लीतील भाजप आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता दिल्लीची कमान महिला सांभाळणार आहे. नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश शर्मा यांचं नाव उपमुखमंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. तर आता रेखा गुप्ता आता २० फेब्रवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

भाजपच्या बैठकीत वरिष्ठांची नियुक्ती

रेखा गुप्ता आणि प्रवेश वर्मा बुधवारी साडे बारा वाजता रामलीला मैदानात शपथ घेतील. यावेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे. भाजपच्या वरिष्ठांनी आमदारांच्या बैठकीत वरिष्ठ नेता ओपी धनखड आणि रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती केली होती.

 Rekha Gupta news
Former BJP Corporator: धक्कादायक! भाजपच्या माजी नगरसेवकाचा पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न
 Rekha Gupta news
BJP Leader Begging: भाजप नेते भीक मागताना दिसले, फोटो व्हायरल होताच चर्चेला उधाण

११ दिवसानंतर मुख्यमंत्रिपदाची घोषणा

दिल्लीत भाजपला २६ वर्षांनी मोठा विजय प्राप्त झाला आहे. आठ फेब्रवारी रोजी भाजपला ७० जागांपैकी ४८ जागा मिळाल्या. त्यानंतर ११ दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी उशीर लागत असल्याने आम आदमी पक्षाकडून टीका केली जात होती.

 Rekha Gupta news
Mumbai BJP : मंत्र्यांवर 'पक्ष सचिवां'ची करडी नजर, मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा?

कोण आहेत रेखा गुप्ता?

रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. तर सध्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांनी आप नेता बंदना कुमारी यांना २९,५९५ मतांनी धूळ चारली. रेखा गुप्ता यांना ६८,२०० मते मिळाली. तर बंदना कुमारी यांना ३८,६०५ मते मिळाली. काँग्रेसच्या प्रवीण जैन यांना ४,८९२ मते मिळाली.

रेखा गुप्ता भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अपाध्यक्षा आहेत. त्या हरियाणाच्या जींद येथे राहणाऱ्या आहेत. त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या सचिव आणि अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यांनी २००७ आणि २०१२ साली उत्तरी पीतमपुरा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला.

 Rekha Gupta news
Maharashtra Politics : मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे आहोत; CM फडणवीसांचं सूचक वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com