India Pakistan War: पाककडून निर्लज्जपणाचा कळस, पाक पुन्हा उभारणार दहशतवादी तळ

Terror Hubs In Pakistan: भारताच्या कारवाईत दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्यानंतरही पाकिस्तान सरकार पुन्हा हे तळ उभारण्याच्या तयारीत आहे. काही खास दहशतवादी गटांवर पाकची विशेष मेहरबानी दिसून येते.
India Pakistan War
India Pakistan Warsaam tv
Published On

भीकेचा कटोरा घेऊन दारोदारी भटकणा-या पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी मात्र सरकारी पेटारा उघडलाय. पाक आता अधिकृतरित्या दहशतवाद्यांना पोसणार आहे. त्याची योजना पाकनं जाहीर केलीय. ही योजना नेमकी काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

भारतासोबत पंगा घेणं पाकिस्तानला चांगलच महागात पडलं. भारताच्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं मोठं नुकसान झालं. तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपयांची मदत मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना जाहीर केली. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा निर्लज्जपणाचा कळस करत दहशतवाद्यांसाठी तिजोरी खुली केलीय. पाक सरकार दहशतवाद्यांचे उद्धवस्त झालेले तळ पुन्हा उभारणार आहेत. यात कोणत्या दहशतवादी तळांवर पाक सरकार मेहरबान झालयं.

पाक उभारणार पुन्हा दहशतवादी तळ

1) लष्कर-ए-तोयबा

ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए- तोयबाचे दहशतवादी तळ उद्धवस्त

मुरीदके, सवाई नाला इथले दहशतवादी तळ बेचिराख

हाफिज सईद तोयबाच्या ट्रेनिंग कॅम्पचा प्रमुख

सईद 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार

पाकिस्तान बांधणार लष्कर-ए-तोयबाचा ट्रेनिंग कॅम्प

2) जैश-ए-मोहम्मद

बहावलपूरमधील जैशचे ऑपरेशनल सेंटर उद्धवस्त

सरजल, बिलाल कॅम्प आणि कोटली बेचिराख

मसूद अझहर जैशचा प्रमुख

पाक सरकार उभारणार जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल सेंटर

3) हिजबुल मुजाहिद्दीन

कोटली, सियालकोट आणि राहिल शहीद कॅम्प उद्धवस्त

काश्मीरमध्ये दहशत पसरवते हिजबुल मुजाहिदीन

हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन

पाक बांधणार कोट्यवधी रुपये खर्चून हिजबुल मुजाहिदीनची छावणी

भारताच्या हल्ल्यात उद्धवस्त झालेले दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प पुन्हा उभारण्यासाठी पाकनं आपली सरकारी तिजोरी खुली केलीय. त्यामुळे IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊन पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतयं का? असा सवाल निर्माण झालाय. अशात हाती भिकेचा कटोरा आणि दहशतवाद्यांसाठी उघडला पेटारा अशी पाकची अवस्था झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com