Pakistan petroleum smart lockdown latest new : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. अनेक देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पडला आहे. आर्थिक स्थितीही ढासाळत आहे. त्यातच आता भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. रात्री ८ नंतर पाकिस्तानमध्ये कडक लॉकडाऊन असेल अशी माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. पाकिस्तान सरकार 'पेट्रोलियम स्मार्ट लॉकडाऊन' लावण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या प्रमुख मीडियाने दाखवल्या आहेत.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे पाकिस्तान ऊर्जा संकटात सापडला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इस्लामाबादच्या आधीच कमी झालेल्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव आला आहे.
देशांतर्गत इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या पाकिस्तानचा प्रयत्नाला यश आले नाही. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशभरात सर्वसमावेशक “पेट्रोलियम स्मार्ट लॉकडाऊन” लागू करण्याचा विचार करत असल्याची बातम्या समोर आल्या.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा सर्वात भीषण फटका पाकिस्तानला बसताना दिसत आहे. देशातील इंधनाचा साठा वेगाने संपत आल्यामुळे पाकिस्तान सरकार आता 'पेट्रोलियम स्मार्ट लॉकडाऊन' (Petroleum Smart Lockdown) लागू करण्याच्या विचारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देशांमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे पाकिस्तानमधील इंधन वितरणावर कडक मर्यादा आणल्या जाऊ शकतात.
आठवड्यातून काही ठराविक दिवसच पेट्रोल पंपांवर इंधन विक्रीस परवानगी देणे, सरकारी वाहनांच्या वापरावर निर्बंध आणणे आणि वर्क-फ्रॉम-होम लागू करणे यांसारखे कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव गगनाला भिडल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची चिंता आणखी वाढली आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यामध्ये देशातील स्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतरच्या मुख्य प्रस्तावांनुसार , सरकार सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संस्थांसाठी चार दिवसांचा आठवडा अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.
शुक्रवार ते रविवारपर्यंत साप्ताहिक सुट्ट्या देण्यात येतील. त्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शहरी वाहतुकीवरील ताण कमी करणे, हे अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. दरम्यान अप्रत्यक्ष ऊर्जा आणि इंधन वापराला आळा घालण्यासाठी व्यावसायिक बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि कार्यक्रम स्थळे सायंकाळच्या सुरुवातीला बंद ठेवण्याचा प्रस्तावात समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.