Soldiers and officers resign from Pakistan Army
Soldiers and officers resign from Pakistan Army Saam Tv News

भारतासोबतचे संबंध खराब, पाकिस्तानाच्या सैन्यात राजीनाम्यांचा पाऊस; लेटर बॉम्बने पाकिस्तान हादरलं

Pakistan Army Resign : पाकिस्तानी सैन्यातील ५०० सैनिक आणि १०० अधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणांचा संदर्भ देत राजीनामे दिले आहेत. अवघ्या २ दिवसांत पाकिस्तानी लष्करात राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे.
Published on

इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री भारताला थेट युद्धाच्या धमक्या देत आहेत. पण दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याच्या मनोबलावर आणि मासिकतेवर सातत्याने परिणाम होत आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांच्या कुटुंबियांनी देश सोडला आहे. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांना युरोपियन देशांमध्ये पाठवलं आहे. वरिष्ठ पातळीवर ही अवस्था असताना आता प्रत्यक्षात युद्धभूमीवर लढणाऱ्या अधिकारी आणि सैनिकांचं मनोबल देखील खचलं आहे.

पाकिस्तानी सैन्यातील ५०० सैनिक आणि १०० अधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणांचा संदर्भ देत राजीनामे दिले आहेत. अवघ्या २ दिवसांत पाकिस्तानी लष्करात राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे सैन्याची यु्द्ध लढण्याची मानसिकता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानी सैन्यात बंडाळी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सैन्याच्या कमांडर्सकडून सातत्याने बदलले जाणारे आदेश, मानसिक थकवा यामुळे सैनिक आणि अधिकारी वर्गाने राजीनामा देऊन कार्यमुक्त होण्याचा मार्ग निवडला आहे.

Soldiers and officers resign from Pakistan Army
VIDEO : तो झिपलाईनवाला 'अल्लाह हू अकबर' तीनवेळा म्हणाला, खाली बेछूट गोळीबार; पर्यटकानं सांगितला थरकाप उडवणारा थरार

सामूहिक राजीनाम्यांमुळे भारताला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेच्या सुरक्षेचा प्रश्न पाकिस्तानला सतावू लागला आहे. भारत-पाक सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी ११व्या कोअरकडे आहे. याचं नेतृत्व सध्याच्या घडीला कमांडर लेफ्टनंट जनरल उमर अहमद बुखारी यांच्याकडे आहे. त्यांनी लष्करी मुख्यालयाला पत्र देऊन स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

भारतासोबतचा वाढता तणाव पाकिस्तानी सैन्यासाठी त्रासदायक ठरतो आहे. सैन्याचे कमांडर स्पष्ट आदेश देण्यात अपयशी ठरल्याने सैनिकांना काय करावं समजत नाहीय. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. एका कोअरकडून दुसऱ्या कोअरला रिपोर्टिंग करण्याचे आदेश दिले जात आहेत. अधिकारी आणि सैनिकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे सैन्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

Soldiers and officers resign from Pakistan Army
Sindhdurg News: धक्कादायक! मदरशात आढळली अवैध हत्यारं, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com