Pahalgam Terror Attack: अंदाधुंद गोळीबार सुरू होता..,पोरांना छातीशी घेतलं अन्...;भाजपच्या नेत्यासाठी देवदूत बनला काश्मिरी मुस्लीम व्यक्ती

Pahalgam Attack Muslim Man Save BJp Leders Family: छत्तीसगड भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अरविंद अग्रवाल यांच्या कुटुंबाला स्थानिक गाइड नझाकत अहमद शहाने वाचवलं. अग्रवाल यांनी हल्ल्याचा थरार आणि निडर नझाकतची धैर्य कथा सांगितली.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Attack Muslim Man Save BJp Leders Family :saam Tv
Published On

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने अख्खा देशात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव,धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत दोषींना कडक कारवाई करावी अशी मागणी केलीय. भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं म्हणत पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेत त्यांना धडा शिकवलाय.

दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. यातून दहशतवाद्यांनी देशातील धार्मिक सहिष्णुता आणि एकातेला छेद देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतातील नागरिकांनी एकतेचा संदेश देत त्यांचा कुटील डाव हाणून पाडला. त्याचं उदाहरण म्हणजे पहलगामध्ये हल्ला झाला त्यावेळी अनेक पर्यटकांना मुस्लिम नागरिकांनी वाचवलं. त्यांनी माणुसकीच्या नात्या धर्म आणला नाही. अशीच हृदयाला छेडणारी आपबीती छत्तीसगडमधील भाजप नेत्याने सांगितली आहे. छ्त्तीसगडमधील भाजप नेत्यालाही एका काश्मिरी मुस्लीम व्यक्तीने वाचवलंय. हा काश्मिरी मुस्लीम व्यक्ती भाजप नेता आणि त्यांच्या कुटुंबियासाठी खरा देवदूत ठरलाय.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्यानंतर Thank You Pakistan, Thank You Lashkar-e-Taibaची पोस्ट व्हायरल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गाइड नझाकत अहमद शहा बनला देवदूत

छत्तीसगडमधील भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अरविंद अग्रवाल यांनी नझाकत अहमद शहाचे आभार मानलेत. नझाकत कसा आपल्यासाठी देवदूत ठरला याची माहितीरही त्यांनी दिली. अरविंद अग्रवाल हे चिरीमिरी शहरातील रहिवासी आहेत. दरम्यान पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी नझाकत तेथेच होते. नाजकत हे गाइड आहेत. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला त्यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या पर्यटकांचा जीव वाचवला. गाइड नझाकतने कशाप्रकारे भाजप नेत्याच्या कुटुंबियांचा जीव वाचवला याची माहिती खुद्द भाजप कार्यकर्त्याने दिलीय.

बायको आणि पोरं दूर गोळीबारीमध्ये अडकली

मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा इतर पर्यटकांनी भाजप कार्यकर्त्याला घटनास्थळामधून सुरक्षितपणे बाहेर काढलं. परंतु त्यांची पत्नी पूजा आणि चार वर्षांची मुलगी काही अंतरावर होती. हल्ला होण्याआधी सर्व काही शांत होतं होतं आणि अग्रवाल फोटो काढत होते. तेव्हा अचनाक गोळीबार सुरू झाला. सर्वत्र पळापळ सुरू झाली. तेव्हा अग्रवाल यांची चार वर्षांची मुलगी आणि त्यांची पत्नी त्यांच्यापासून काही अंतरावर होत्या. त्यांच्यासोबत दुसरं एक जोडपं आणि त्यांचे मूलंही होते. त्यावेळी गाइड नझाकतही त्यांच्यासोबत होता.

पोरांना मिठी मारली अन्...

जेव्हा गोळीबार सुरू झाला, तेव्हा नझाकतने सर्वांना जमिनीवर झोपायला सांगितले. नझाकत यांनी अग्रवाल यांच्या मुलीला आणि अग्रवाल यांच्या मित्राच्या मुलाला मिठी मारली आणि त्यांचा जीव वाचवला,” असा थरारक अनुभव अग्रवाल यांनी एका वृतवाहिनीला सांगितला. हल्ल्याचा प्रसंग आठवला तरी आपल्या अंगावर काटे उभे राहतात, असं अग्रवाल म्हणतात.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Attack: 'जाओ मोदी को बता देना'; पत्नीच्या समोरच मंजूनाथ यांच्यावर गोळ्या झाडल्या गोळ्या

दरम्यान गोळीबार बंद झाल्यानंतर गाइड नझाकतने त्यांना सुरक्षित ठिकाणी गेलं. त्यानंतर नझाकत अग्रवाल यांच्या पत्नीला वाचवण्यासाठी परत गोळीबारीच्या ठिकाणी गेला. अग्रवाल म्हणतात की, हल्ला घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. सर्वत्र पळापळ सुरू होती. माझाही गोंधळ उडाला होता. त्या गोंधळात पत्नी आणि मुलगी जिंवत आहे की, हे कळण्यासाठी आपल्याला एक तास लागला. अग्रवाल यांनी जेव्हा रुग्णालयात, त्यांची पत्नी आणि मुलीला पाहिले, तेव्हा त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

काय म्हणाले नझाकत?

"आम्ही जिथे उभे होतो तिथून सुमारे २० मीटर अंतरावर झिपलाइनजवळ गोळीबार सुरू होता," आधी मी माझ्या आजूबाजूच्या सर्वांना जमिनीवर झोपायला सांगितलं. मग मला कुंपणात एक मोकळी जागा दिसली. मी मुलांना त्या दिशेने जाण्यास सांगितलं. दहशतवादी आमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आम्ही तेथून पळून गेलो, अशी माहिती नझाकत यांनी दिली.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Attack: 'मेरी ख्वाइश तू...' नौदल अधिकाऱ्याचा पत्नीसोबतचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल

मुलांना सुरक्षित ठिकाणी आणलं तेव्हा अग्रवाल यांची पत्नी घाबरून दुसऱ्या दिशेने पळून गेल्या होत्या. मी त्यांना शोधू लागलो. त्या मला दीड किलोमीटर दूर सापडल्या. त्यांना मी माझ्या कारने माघारी आणलं आणि सर्वांना श्रीनगरला पोहोचवलं. पुढे बोलातना नाझकत म्हणाले, पर्यटन हाच आमचा उदरनिर्वाह आहे. पर्यटन नसलं तर आम्ही बेरोजगार राहू. आमच्या मुलांचे शिक्षणही त्यावर अवलंबून आहे. दहशतवादी हल्ला हा आमच्या हृदयावर हल्ला केल्या सारखं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com