Pahalgam Attack: पाकिस्तानविरुद्ध मोठा पुरावा सापडला; पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड निघाला पाक सैन्याचा माजी कमांडो

Pahalgam Terror Attack Mastermind Hashim Musa : पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीनपैकी एक दहशतवादी हाशिम मुसा याचे पाकिस्तानसोबतचे कनेक्शन उघड झाले आहे. मुसा याआधी पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सचा एसएसजी कमांडो होता.
Pahalgam  Attack has been revealed after the NIA investigated
Pahalgam Attack has been revealed after the NIA investigatedSaam Tv News
Published On

Who Is Hashim Musa : भारताचं नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिलला दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख उघड झालीय. त्यात ली भाई, आदिल हुसैन ठोकर आणि हाशिम मुसा उर्फ सुलेमान यांचा समावेश आहे. हाशिम मुसाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मूळचा पाकिस्तानी असलेला हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी उर्फ सुलेमान हा पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्स एसएसजीचा कमांडो होता. पाकिस्तानी सैन्यात त्याला आसिफ फौजी या नावानं ओळखलं जायचं. एक-दीड वर्षापूर्वी ज्या गटानं पुंछ राजौरीमध्ये घुसखोरी केली होती, त्यात हाच दहशतवादी होता का, याची माहिती घेण्याचे काम सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पुंछमध्ये लष्कराच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ते याच गटाचे कृत्य असू शकते, असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळख पटली

पहलगाममध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबु तल्हा हे तिघे असल्याची माहिती समोर आली आहे. हे दहशतवादी टीआरएफ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना बंदी घातलेल्या लश्कर ए तोयबाशी संबंधित आहे. या दहशतवाद्यांनी पहलगामपासून ६ किलोमीटरवरील बैसरन येथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला होता.

Pahalgam  Attack has been revealed after the NIA investigated
India-Pakistan : भारताच्या वॉटर स्ट्राइक, डिजिटल स्ट्राइकनंतर एअर स्ट्राइकची भीती; पाकिस्तानला दरदरून घाम फुटला

मास्टरमाइंड कोण?

लश्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा पहलगाम हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार असल्याचं सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांचे डिजिटल फूटप्रिंट पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद आणि कराचीच्या ठिकाणांशी संबंधित असल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सीमेपलीकडे पहलगाम हल्ल्याचा कट शिजल्याच्या संशयाला बळकटी मिळत आहे.

Pahalgam  Attack has been revealed after the NIA investigated
India-Pakistan : मोठं काहीतरी घडतंय! संरक्षण मंत्री आधी लष्करप्रमुखांना भेटले, नंतर थेट पंतप्रधान मोदींशी चर्चा

सैन्याच्या गणवेशात आले होते दहशतवादी

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. काही दहशतवादी हे लष्करातील सैन्याचा गणवेश आणि कुर्ता पायजमा घालून घटनास्थळाजवळच्या जंगलातून आले होते. त्यांच्याकडे एके ४७ होत्या. या दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com