India-Pakistan : मोठं काहीतरी घडतंय! संरक्षण मंत्री आधी लष्करप्रमुखांना भेटले, नंतर थेट पंतप्रधान मोदींशी चर्चा

Rajnath Singh Meets PM Modi : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पहलगाममधील मोहीम आणि तेथील परिस्थितीची माहिती दिली. त्याआधी राजनाथ यांना साउथ ब्लॉक येथे लष्करप्रमुखांनी सैन्याच्या मोहिमेची माहिती दिली होती.
संरक्षण मंत्र्यांची आधी लष्करप्रमुखांशी चर्चा, नंतर पंतप्रधान मोदींसोबत बैठक, मोठं काही तरी घडणार?
PM modi Rajnath Singh Meetingsaam tv
Published On

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या दोन देशांमध्ये मोठं काहीतरी घडू शकतं, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सकाळीच लष्करप्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर ते थेट लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी नरेंद्र मोदींशी चर्चा केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि लष्कराच्या मोहिमेबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदी यांच्यात जवळपास ४० मिनिटे सखोल चर्चा झाली.

राजनाथ सिंह यांनी मोदी यांच्याशी चर्चा केली. पहलगाम हल्ल्यानंतर तेथे सुरू असलेली मोहीम आणि सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्याआधी सोमवारी सकाळीच संरक्षण मंत्री साउथ ब्लॉकला गेले होते. तेथे त्यांना लष्करप्रमुखांनी लष्कराच्या मोहिमेची माहिती विस्तृतपणे दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसते. हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली.

तसेच, भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, मोठं काही तरी घडणार आहे, अशी चर्चा जगभरात सुरू झाली आहे. भारताकडून दहशतवाद्यांना मोठा तडाखा दिला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीपासून सीमाभागापर्यंत सर्व यंत्रणा हायअलर्टवर आहेत.

संरक्षण मंत्र्यांची आधी लष्करप्रमुखांशी चर्चा, नंतर पंतप्रधान मोदींसोबत बैठक, मोठं काही तरी घडणार?
Pahalgam Attack: 'पाकिस्तान अर्धा तास नाही तर ५० वर्षे मागे', पहलगाम हल्ल्यावरून असदुद्दीन ओवैसी संतापले

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. सरकारनंही दहशतवाद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जम्मू - काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेतली आहे.

दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी काश्मीरच्या प्रत्येक भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे सरकारने मोठी तयारी केली आहे, असे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील बैठकीची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. ही बैठक लष्कराच्या योजनेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

संरक्षण मंत्र्यांची आधी लष्करप्रमुखांशी चर्चा, नंतर पंतप्रधान मोदींसोबत बैठक, मोठं काही तरी घडणार?
Pahalgam Attack: भारताकडून पाकड्यांची आर्थिक कोंडी; पाकिस्तानच्या मूळावर घाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com