Pahalgam Attack: कठुआत ४ संशयित दिसले, महिलेच्या माहितीनंतर खळबळ; भारतीय जवानांचं सर्च ऑपरेशन

Kathua Jammu -Kashmir : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी सर्वात मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलंय. कठुआत चार संशयित दिसून आल्याची माहिती एका महिलेने सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर ही शोधमोहीम हाती घेतलीय.
जम्मू-काश्मिरातील कठुआत ४ संशयित दहशतवादी
pahalgam attacksaam tv
Published On

पहलगाममध्ये पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षिततेचा मुद्दा चिंतेचा झाला आहे. त्यात कठुआ जिल्ह्यात चार संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती एका महिलेने सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. सर्व यंत्रणा अलर्टवर आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, परिसरात चार संशयित व्यक्तींना बघितल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. महिलेने दिलेल्या माहितीनंतर खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी तात्काळ पावलं उचलली आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप अर्थात एसओजीचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. परिसरात घेराव घातला. येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर, तसेच संशयित हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा परिसर आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. यापूर्वीही या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झालेला होता. संशयित व्यक्ती एखाद्या मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असू शकतात, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. पोलीस आणि सैन्यदलाचे जवान शोधमोहीम राबवताना सावधगिरी बाळगत आहेत. ड्रोन आणि स्निफर डॉग्जच्या मदतीने शोध घेतला जात आहे.

पुलवामामध्येही शोधमोहीम

पुलवामामधील करीमाबाद परिसरातही सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या ठिकाणी दहशतवादी लपून बसतात, असं अनेकदा स्पष्ट झालेले आहे. तसेच परिसरात दहशतवाद्यांसोबत चकमकी झाल्याचेही वृत्त असते. सध्या हा परिसर घेरला आहे.

जम्मू-काश्मिरातील कठुआत ४ संशयित दहशतवादी
Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले; शेकडो पर्यटकांनी केले काश्मीरचे बुकिंग रद्द

लष्करप्रमुख उधमपूरमध्ये

पहलगाम हल्ल्यानंतर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी स्वतः जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधील मुख्यालयात पोहोचले. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एलओसीवर पूंछ आणि राजौरी जिल्हा आणि पीर पंजाल रेंजच्या दक्षिण परिसरातील सुरक्षेविषयक परिस्थितीची माहिती त्यांना दिली जात आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जात आहे.

जम्मू-काश्मिरातील कठुआत ४ संशयित दहशतवादी
Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तानचा युद्धाभ्यास सुरू, बॉर्डरवर हालचालींना वेग|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com