Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले; शेकडो पर्यटकांनी केले काश्मीरचे बुकिंग रद्द

Kalyan News : पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार करत हल्ला केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. यात २६ पर्यटकांचा जीव गेला. तर येथे असलेले पर्यटक देखील परत येऊ लागले
Pahalgam Attack
Pahalgam AttackSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये येथे पर्यटनासाठी गेलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काश्मीरला जाण्याचा करण्यात आलेला प्लॅन रद्द करत ट्रॅव्हल्स व रेल्वेचे करण्यात आलेले बुकिंग देखील रद्द करण्यात आले आहे. 

काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार करत हल्ला केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा जीव गेला आहे. तर हल्ल्यानंतर येथे असलेले पर्यटक देखील परत येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे सुट्यांमध्ये फिरण्यासाठी काश्मीरला जाण्याचा आखलेला प्लॅन देखील अनेकांनी पुढे ढकलला आहे. जाण्यासाठी बुकिंग केले होते, त्या नागरिकांनी आता बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीला फोन करण्यास सुरुवात केली आहे. 

Pahalgam Attack
Miraj News : शेत जमिनीचा वाद; माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

सुट्यांमधील बुकिंग होते फुल्ल 

काश्मीरच नव्हे, तर काश्मीरच्या आजूबाजूला असलेले लडाख, गुलबर्ग आदी भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंग देखील भीतीपोटी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत देशपांडे ट्रॅव्हल्सचे प्रथमेश देशपांडे यांनी संगितले की, ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीर व आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पर्यटन वाढलं होते. सुट्ट्यांमध्ये ६०० ते ७०० बुकिंग झाले होते. मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरले. काश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी दिवसभर फोन येत आहेत. 

Pahalgam Attack
Nagpur Crime News : नागपूर हादरले; जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात गाठत तरुणाला संपविले

नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण 

अगदीच हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी देखील बुकिंगसाठी फोन करण्यात येत होते. मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील नागरिक जाण्यास आता घाबरत आहेत. सरकारने पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी प्रथमेश याने केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com