

इराण-इस्रायल युद्धामुळं एलपीजी गॅस संकटाचे ढग गडद होत असतानाच, काळाबाजारीला ऊत आला आहे. पण गॅसच्या काळाबाजारीचा बाजार आता उठणार आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी दिला नाही तर, गॅस ग्राहकांना सिलिंडर मिळणार नाही. हा नियम संपूर्ण देशभर लागू करण्यात येत आहे. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये अनेक कंपन्यांनी आधीपासूनच ओटीपी नियमांतर्गत एलपीजी सिलेंडर देण्यास सुरुवात केली आहे.
पश्चिम आशियात तणावाची परिस्थिती आहे. इराण-इस्रायल संघर्ष चिघळला आहे. जगभरातील अनेक देशांत एलपीजी संकट निर्माण झालं असून, भारतातही त्याचे परिणाम दिसून आलेले आहेत. एलपीजीचा तुटवडा देशभरात जाणवतोय. काळाबाजारीलाही ऊत आला आहे. ते रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सरकार नवीन नियम लागू करत आहे. गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हे नियम केले जात आहेत. सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी ओटीपी नियमही लागू करण्यात येत आहे. त्यानुसार, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरील ओटीपी दिला नाही तर गॅस एजन्सीचे कर्मचारी एलपीजी सिलिंडर देणार नाहीत.
ओटीपी दिला तरच ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. मुंबई, दिल्लीसारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये विविध कंपन्यांनी हा ओटीपी नियम लागू केला आहे. त्यानुसारच एलपीजी सिलिंडर देण्यात येत आहेत. या नियमामुळं सर्वसामान्यांना फायदाच होणार आहे. तर गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांना रोखता येणार आहे.
ग्राहकांना एलपीजी सिलिंडर दिल्याचे भासवणे (फेक डिलिव्हरी), साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकार देशभरात नवे नियम लागू करत आहे. नव्या नियमानुसार, ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सिलिंडर देताना एक ओटीपी येईल. तो गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना सांगावा लागणार आहे. ओटीपी सांगितल्यानंतर संबंधित कर्मचारी सिस्टममध्ये अपडेट करेल. तेव्हाच तो सिलिंडर ग्राहकांना दिला जाईल. जर कर्मचाऱ्यांना ओटीपी दिला नाही तर सिलिंडरही मिळणार नाही. या ओटीपीमुळं ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळाल्याची खात्री होईल.
गॅस एजन्सीचे कर्मचारी सिलिंडर न देताच सिलिंडर दिल्याचे दाखवत होते.
सिलिंडरचा साठा करून ते ब्लॅकने विकायचे.
देशभरातील अनेक ग्राहकांची ही तक्रार होती.
ओटीपी नियम सुरू झाल्यानं गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांना काळाबाजार करण्यापासून रोखता येणार
जोपर्यंत ग्राहकाकडून ओटीपी घेऊन ते सिस्टममध्ये अपडेट करत नाहीत, तोपर्यंत सिलिंडरची डिलिव्हरी यशस्वी झाले असे मानता येणार नाही.
ओटीपी अपडेट करण्यासाठी त्यांना संबंधित ग्राहकाला सिलिंडर द्यावाच लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.