२५ वर्षीय डान्सरचा घरात आढळला मृतदेह; मनोरंजन सृष्टीत खळबळ

dancer ends life : २५ वर्षीय डान्सरचा घरात मृतदेह आढळल्याचा समोर आलं आहे. डान्सरच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे.
dancer news
dancer ends life Saam tv
Published On
Summary

ऑर्केस्ट्रा डान्सरने आत्महत्या केल्याने खळबळ

दलसिंहसराय पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली घटना

तरुणी करायची ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये काम

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका ऑर्केस्ट्रा डान्सरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. २५ वर्षीय डान्सरचा घरात मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दलसिंहसराय पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आत्महत्या केलेली तरुणी ही एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये काम करायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी डान्सर ही झारखंडमध्ये राहणारा सूरज कुमार यांची पत्नी काजल कुमारी असल्याचे समोर आले आहे. ती दलसिंहराय पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वॉर्ड -११ मध्ये एका घरात भाडे तत्वावर राहत होती. मागील तीन वर्षांपासून या घरात राहत होती.

काजलच्या घराचा दरवाजा रविवारी सकाळी दुपारपर्यंत उघडला नव्हता. यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तिच्या घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं. त्यावेळी तिने आत्महत्या केल्याचे शेजाऱ्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

dancer news
Shocking : नागपूर हादरले! माय लेकीची राहत्या घरात आत्महत्या; तपासात धक्कादायक कारण समोर

पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली. पोलीस अधीक्षक विवेक कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या विशेष पथकाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनंतर काजलच्या मृत्यूचे कारण समोर येईल.

पोलीस अधीक्षक विवेक कुमार शर्मा यांनी सांगितलं की, महिलेचा मृतदेह घरात आढळला. तिचा मोबाइल बेडवर होता. तिचा मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. तिच्याजवळ एक चिठ्ठी देखील आढळली. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे'.

dancer news
सोलापूर हादरलं! विवाहितेनं दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं

तिने घरात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी देखील आढळली आहे. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांची चौकशी देखील केली आहे. त्यानंतरही तिच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासानुसार डान्सरने आत्महत्या केल्याचे मानत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com