Viral Video : बापरे, कसला निर्दयीपणा! स्कूटी चालकाने वृद्धाला दिड KM फरफटत नेलं, थरकाप उडवणारा व्हिडिओ

घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Man Dragged By Scooter
Man Dragged By ScooterSaam Tv

Man Dragged By Scooter : कर्नाटकातील बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. एक दुचाकीस्वाराने एका वृद्धाला तब्बल दिड किलोमीटर फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Man Dragged By Scooter
Eknath Khadse : राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? राष्ट्रवादीचा बडा नेता आठवडाभरापासून नॉट रिचेबल!

एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा थरार व्हिडिओ (Viral Video)कैद केला आहे. कार आणि दुचाकीस्वाराची टक्कर झाली. त्यानतंर या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद हाणमारीपर्यंत आल्यावर दुचाकीस्वार तिथून पळून जाऊ लागला.

यादरम्यान कार चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वार त्याला फरफटत घेऊन गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेत वृद्धाला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू मधील मागदी रोडवर ही घटना घडली आहे. वृद्धाला स्कूटरने रस्त्यावर फरफटत नेलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाविरुद्ध गोविंदराज नगरपोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तो रुग्णालयात असल्याने त्याच्यावर नंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com