Maldives China Military Deal: मोठी बातमी! मालदीवचा चीनसोबत करार, भारतीय सैनिकांची एक्झिट

Indian Troops In Maldives: मालदीवने चीनसोबत एक करार केला आहे. त्यानंतर मालदीवमध्ये 10 मे नंतर एकही भारतीय सैनिक उपस्थित राहणार नाही, असं वक्तव्य मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी केलं आहे.
President Muizzu
President MuizzuYandex
Published On

President Muizzu On Indian Troops

मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधातील दुरावा अजूनही कायम आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत नाहीत. चीनसोबत झालेल्या लष्करी करारांदरम्यान मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 10 मे नंतर कोणत्याही भारतीय सैनिकाला (Indian Troops) मालदीवमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. (latest accident news)

भारतीय सैन्य (Indian Troops In Maldives) कोणत्याही प्रकारे मालदीवमध्ये राहू शकत नाही. भारतीय सैन्य मालदीव सोडत नाहीये. भारतीय सैनिक साधे कपडे घालून मालदीवमध्ये वावरत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालदीव आणि चीनमध्ये लष्करी करार

सध्या 88 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये आहेत. ते प्रामुख्याने दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान (Maldives China Military Deal) चालवतात. याद्वारे त्यांनी शेकडो वैद्यकीय बचाव आणि मानवतावादी मदत मोहिमा पूर्ण केल्या आहेत. या लष्करी कर्मचाऱ्यांना 10 मे पूर्वी मालदीव सोडण्यासाठी सांगण्यात आलं आहे. 10 मे नंतर कोणत्याही भारतीय सैनिकाला मालदीवमध्ये राहण्यास परवानगी दिली जाणार नाही, असं मुइझ्झू यांनी सांगितलं आहे.

मालदीव आणि चीन यांच्यातील जवळीक वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये दोन लष्करी करार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चीनने मालदीवला कोणत्याही अटीशिवाय लष्करी मदत देण्याचं आश्वासन दिले (Maldives China Deal) आहे. मात्र, ही लष्करी मदत कोणत्या प्रकारची असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक घट्ट झाल्याची माहिती मिळत आहे.

President Muizzu
Maldives parliament: मालदीवच्या संसदेत मोठा राडा; मतदानादरम्यान खासदारांमध्ये हाणामारी

भारत आणि मालदीवमध्ये तणाव

भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींच्या दौऱ्यातील काही छायाचित्रांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली (Maldives India Deal) होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक वाद अधिक वाढले आहेत.

मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू (President Muizzu) हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरून परतल्यानंतर मुइझूंनी मोठे निर्णय घेतले आहेत.

President Muizzu
Maldives VS Lakshadweep: सेलिब्रिटीनंतर आता मालदीववर FWICE ची नाराजी, निर्मात्यांना चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याचे केले आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com