भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणाव चालू आहे, यात चीनने तेल ओतण्याचं काम केलं आहे. चीनने भारताचं नाव न घेता मालदीववरून इशारा दिलाय. मालदीवच्या अंतर्गत वादात दुसऱ्या देशांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास चीन त्याचा विरोध करेल, असा इशारा चीनने दिलाय. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मोहम्मद मुइज्जू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.(Latest News)
याचदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन सहयोग वाढवण्याचे करार केलेत. यावेळी चीने भारताला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. दुसऱ्या देशाने मालदीवच्या अंतर्गत वादात हस्तक्षेप करू नये. मालदीव आपल्या देशात चीनविरोधी कारवाया होऊ देणार नाही. तसेच मालदीव (Maldives) चीनच्या (china) धोरणाचा पालन करेल असं चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी (President China) म्हटलंय. चीनच्या सरकारचे (Government) मुखपत्र असलेलं ग्लोबल टाइम्सने चीन आणि मालदीव या दोन्ही देशांनी संयुक्तपणे जारी केलेल्या विधानानुसार, म्हटलं की, चीन मालदीवमधील अंतर्गत असलेल्या वादांववर बाहेरील देशांनी हस्तक्षेप केल्यास चीन त्याचा विरोध करेल. चीन नेहमी मालदीवच्या पाठीशी असेल. मालदीवचे राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा राखण्यासाठी मालदीवच्या प्रयत्नांना चीन समर्थन देईल असं म्हटलंय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चीनच्या सरकारचे मुखपत्र असलेलं ग्लोबल टाइम्सने चीन आणि मालदीव या दोन्ही देशांनी संयुक्तपणे जारी केलेल्या विधानानुसार, म्हटलं की, चीन मालदीवमधील अंतर्गत असलेल्या वादांववर बाहेरील देशांनी हस्तक्षेप केल्यास चीन त्याचा विरोध करेल. चीन नेहमी मालदीवच्या पाठीशी असेल. मालदीवचे राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा राखण्यासाठी मालदीवच्या प्रयत्नांना चीन समर्थन देईल असं म्हटलंय. दोन्ही देशांकडून आलेल्या या विधानात भारताचा कोणताच उल्लेख नव्हता परंतु अप्रत्यक्षपणे चीनने भारताला इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे.
चीन मालदीवसह प्रशासकीय अनुभवाचे आदान-प्रदान केले जाईल. विकासचे धोरण, उच्च गुणवत्ता असलेले रोड बेल्ट प्रोजेक्टला प्रोत्साहन देण्यात येईल. हे करार मालदीव आणि चीनच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होईल, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.