India And Maldives: भारताचं कौतुक करत आपल्याच सरकारवर भडकल्या मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री, म्हणाल्या...

PM Modi Maldives Visit: भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या तणावाबाबत मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद यांनी वक्तव्य केलंय. भारत मालदीवचा ऐतिहासिक मित्र आहे. भारत मालदीवला कठीण काळात मदत करतो, असं त्यांनी म्हटलंय.
Maldives Former Defense Minister Maria Ahmed
Maldives Former Defense Minister Maria AhmedSaam Tv
Published On

Maldives Former Defense Minister Maria Ahmed

मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात मालदीवच्या नेत्यांच्या अपमानास्पद वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. त्या म्हणाल्या पंतप्रधान मोदींवरील अपमानास्पद टिप्पण्या मालदीव सरकारचा 'अदूरदर्शीपणा' दर्शवतात. भारताने मालदीवला संरक्षणासह अनेक क्षेत्रात मदत केलीय. भारत हा एक विश्वासार्ह मित्र आहे. भारतासोबतचे दीर्घकालीन संबंध कमकुवत करण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी निषेध केलाय. (latest marathi news)

माध्यमांशी बोलताना मारिया अहमद म्हणाल्या की, आम्ही एक छोटा देश आहोत, आमची सर्वांशी मैत्री आहे. आमच्या सीमा भारताशी संलग्न आहेत, हे आम्ही नाकारू शकत नाही. भारताने आम्हाला नेहमीच मदत केलीय. संरक्षण क्षेत्रात आमची क्षमता विकसित करण्यासाठी, संरक्षण उपकरणे पुरवण्यासाठी आणि आम्हाला अधिक स्वावलंबी बनवण्यासाठी भारत मदत करत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, भारतासोबतचे शतकानुशतके जुने संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करू शकत नाही, हा सध्याच्या सरकारचा विचार त्यांचा 'अदूरदर्शीपणा' दर्शवितो, असं त्यांनी म्हटलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत आणि मालदीवमधील वाद

गेल्या आठवड्यात भारत आणि मालदीवमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यामध्ये मालदीवचे मंत्री, कॅबिनेट सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती आणि भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केलं होतं.

लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देणार्‍या पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना आणि इतर तीन नेत्यांनी आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. यावरून मालदीवच्या माजी संरक्षण मंत्र्यांनीही मुइज्जू सरकारवर टीका केलीय. त्या म्हणाल्या की भारत हा मालदीवसाठी ९११ क्रमांक आहे. जेव्हा गरज असते, तेव्हा भारताकडे मदत मागितली जाते. भारत लगेच मदत करतो. भारत हा मालदीवचा मित्र आहे, अशा अपमानास्पद टिप्पण्या पाहिल्यावर मन दुखावल्याचं त्यांनी म्हटलंय.

Maldives Former Defense Minister Maria Ahmed
Narendra Modi News | मालदीवच्या मंत्र्यांच्या मोदींवरील टीकेनंतर मालदीव सरकारची आता नरमाईची भूमिका

मालदीवचं धोरण 'इंडिया फर्स्ट'

मालदीव हा भारताचा महत्त्वाचा मित्र देश आहे. अनेक दशकांपासून परंपरा आहे की, नवीन राष्ट्रपतींचा पहिला परदेश दौरा हा भारताचा असतो. पण राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी भारताऐवजी तुर्की, यूएई आणि नंतर चीनला जाणं पसंत केलंय. माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद यांनी चीन समर्थक मानल्या जाणार्‍या मुइझ्झू सरकारच्या मंत्र्यांच्या पंतप्रधान मोदींवर केलेल्या टिप्पणीवर चिंता व्यक्त केलीय. मालदीवचं धोरण 'इंडिया फर्स्ट' असल्याचं त्यांनी म्हटलंय. मारिया अहमद म्हणाल्या की, आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे पालन करू. मालदीव सरकार सर्वांशी मैत्रीचे आपले पारंपारिक परराष्ट्र धोरण कायम ठेवेल. मालदीवचं धोरण 'इंडिया फर्स्ट' राहिलं आहे, मुइझू सरकार ते पुढे चालू ठेवेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलीय.

भारताच्या मदतीबद्दल बोलताना मारिया अहमद म्हणाल्या, 'आमच्याकडे मालदीवमध्ये काही आजारांवर उपचार करण्याची सुविधा नाही. त्यासाठी आम्ही भारतात जातो. कोरोना काळात भारताने आम्हाला कोविड लस दिली होती. भारताची जागा कोणी घेऊ शकेल, असा विचारही करता येणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय.

Maldives Former Defense Minister Maria Ahmed
Narendra Modi News : मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com