पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या काही मंत्र्यांनी अपमानजनक विधान केलं होतं. यानंतर मालदीव सरकारनं या प्रकरणी तीन मंत्र्यांना निलंबित केलंय. मात्र, या प्रकरणानंतर सोशल मीडियावर मालदीव संदर्भात चर्चेला उधाण आलं आहे. (latest marathi news)
मालदीवमधल्या माल, दीवचा अर्थ काय? मालदीव नाव कसं तयार झालं, हा प्रश्न अनेकांना पडतो. मालदीव हे अतिशय अर्थपूर्ण नाव आहे. आपण या शब्दांचा अर्थ सविस्तर जाणून घेवू (Maldive) या.
मालदीवमधील 'माल'-'दीव'चा अर्थ
मालदीव हा संस्कत शब्द आहे. त्यामधील माल हा शब्द मल्याळममधून आलाय. माल शब्दाचा अर्थ 'हार' असा होतो. तर 'दीव' या शब्दाचा अर्थ 'बेट' असा होतो. 'बेटांचा हार' एकत्र येवून मालदीव हा शब्द तयार झालाय. महावंश या प्राचीन श्रीलंकेच्या लेखनात महिलादिवा असंही लिहिलं गेलं आहे. याचा अर्थ महिलाद्वीप असाही होतो.
मालदीवमध्ये किती भारतीय राहतात
परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार मालदीवमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांची संख्या २५ हजार आहे. तर, तेथे भारतीय वंशाच्या लोकांची संख्या १०८ आहे. म्हणजे मालदीवमध्ये एकूण भारतीयांची संख्या २५ हजार १०८ आहे. दरवर्षी हजारो भारतीय लोक मालदीवला भेट देतात. विशेषतः बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी हे खूप खास आहे.
मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी
याप्रकरणी मालदीवचे भारतातील राजदूत इब्राहिम साहिब यांना सोमवारी बोलावण्यात आलं होतं. राजदूत इब्राहिम साहिब यांनी मालदीवच्या अनेक मंत्र्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल तीव्र चिंता व्यंक्त केलीय. तर, मालदीव सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल रविवारी तीन उपमंत्र्यांना निलंबित केलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.