पीएम मोदींनी (PM Modi) नव वर्षाच्या सुरूवातीला लक्षद्वीपचा दौरा (lakshadweep tour) केला. मोदींनी लक्षद्वीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या बेटाच्या सौंदर्यावर बोलले. त्यानंतर लक्षद्वीप बेटांबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर भारत आणि मालदीवमध्ये तणाव वाढू लागला आहे. सध्या नेटकऱ्यांनी मालदीवला बायकॉट (Maldives Boycott) करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. आता पीएम मोदींनी देखील लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. मालदीवला प्रत्युत्तर म्हणून बॉलिवूड (Bollywood) स्टार्ससह देशातील अनेक नामवंत व्यक्ती लक्षद्वीप आणि भारतातील इतर बेटांच्या हितासाठी पुढे आले आहेत.
पीएम मोदींचे लक्षद्वीपला प्रमोट करणं मालदीवच्या लोकांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी पीएम मोदींसोबत भारताला देखील ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आता सोशल मीडियावर मालदीव बायकॉटचा ट्रेंड करत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर, कंगना रनौत या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत पीएम मोदींना पाठिंबा दिला आहे.
अक्षय कुमारने यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट कतत लिहिले की, 'मालदीवच्या प्रमुख पक्षाच्या व्यक्तींनी भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या होत्या. ज्या देशाने सर्वाधिक पर्यटक पाठवले त्या देशासोबत ते असे करत आहेत हे आश्चर्यकारक आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले आहोत, पण असा विनाकारण द्वेष का सहन करावा? मी अनेकदा मालदीवला भेट दिली आहे आणि त्याचे नेहमीच कौतुक केले आहे. परंतु सन्मान प्रथम येतो. आपण भारतीय बेटांचा शोध घेण्याचे ठरवूया आणि आपल्या स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देऊन पुढे नेऊया.'
अक्षय कुमारनंतर बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानने देखील यासंदर्भात ट्वीट करत पीएम मोदींना पाठिंबा दिला. त्याने या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि आश्चर्यकारक समुद्रकिनाऱ्यांवर पाहून खूप छान आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा समुद्रकिनारा आपल्या भारत देशात आहे.'
अभिनेता जॉन अब्राहमने देखील यासंदर्भात ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जॉन अब्राहमने ट्विटमध्ये लिहिले की, 'लक्षद्वीप हे आश्चर्यकारक भारतीय आदरातिथ्य, अतिथी देवो भवाची कल्पना आणि विशाल सागरी जीवनाचा शोध घेऊन भेट देण्यासारखे ठिकाण आहे.'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने देखील या संदर्भात ट्वीट करत लिहिले की, 'गंध? स्थायी गंध? लक्षद्वीपमध्ये 98% मुस्लिम समाज आहे. लक्षद्वीपमध्ये 60 हजार लोक राहतात. पण तरीही हे अज्ञात बेट आहे हे लज्जास्पद आहे.'
अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील ट्वीट करत असे लिहिले की,'हे सर्व फोटो आणि मिम्स मला लक्षद्वीपला भेट देण्यासाठी उत्सुकता वाढवणारे आहेत. लक्षद्वीपमध्ये असा प्राचीन समुद्र किनारा आहे जो स्थानिक संस्कृतीशी समृद्ध आहे. मी आता फक्त सुट्टीची प्रतीक्षा करत आहे. यावर्षी #एक्सप्लोरइंडियनआईलैंड्स का नाही?'
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गु्प्ताने एक जुना फोटो शेअर करत सांगितले की, मी लक्षद्वीपला भेट दिली आहे आणि ते एक जादुई ठिकाण आहे. या फोटोमध्ये ईशा लक्षद्वीपच्या समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे. पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे खूप सुंदर ठिकाण आहे आणि मला पुन्हा इथे जायला आवडेल. तिथे परत जाण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' या पोस्टद्वारे ईशाने भारताला पाठिंबा दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.