KGF स्टार यशच्या वाढदिवशी घडली दुर्दैवी घटना, अभिनेत्याचे कट-आऊट लावताना 3 चाहत्यांचा मृत्यू

Yash 3 Fans Died: यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कटआऊट लावत असताना करंट लागल्यामुळे सहा जण गंभीर जखमी झाले. याचदरम्यान तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त
Yash
YashSaam Tv
Published On

KGF Star Yash Birthday:

साऊथचा सुपरस्टार यश (Yash) अर्थात 'रॉकी भाई' आज आपला ३८ वा वाढदिवस (Yash Birthday) साजरा करत आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते खूपच उत्सुक असून ठिकठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. याचदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कटआऊट लावत असताना करंट लागल्यामुळे 6 जण गंभीर जखमी झाले. याचदरम्यान तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

अभिनेता यशचा मोठा चाहता वर्ग आहे. तो नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. 4 जानेवारीला अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत 'Toxic' चित्रपटाच्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. ऐवढंच नाही तर यशने आपल्या चाहत्यांना वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला भेटू शकणार नाही असे देखील सांगितले. जरी चाहत्यांना भेटू शकलो नाही तरी देखील वाढदिवस धुमधडक्यामध्ये साजरा करण्याचा निर्णय त्याने घेतला.

याचदरम्यान कर्नाटकच्या गडग जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडली. यशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची जोरदार तयार करण्यात येत होती. यशचे चाहते त्याचे मोठे कट-आऊट लावत होते. त्याचवेळी अचानक त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले. यामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे.

Yash
Ira-Nupur Wedding: आयरा - नुपूरच्या मेहंदी सिरेमनीला सुरूवात, 10 जानेवारीला अडकणार विवाहबंधनात; समोर आली लग्नाची पत्रिका

दरम्यान, यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याने 2007 मध्‍ये जंबडा हुडुगी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्याने 2008 मध्ये 'रॉकी', 2013 मध्ये 'गुगली' आणि 2014 मध्ये 'Mr. and Mrs. Ramachari' चित्रपटामध्ये काम केले. पण यशच्या आयुष्याला KGF Chapter 1 मुळे खरी कलाटणी मिळाली. या चित्रपटामुळे तो फक्त देशात आणि जगभरात प्रसिद्ध झाला. यानंतर त्याचा 'KGF Chapter 2' ला देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.

Yash
Animal Team On Javed Akhtar: 'खोटी आहे तुमची कला, तुमच्यासारखे लेखक...', जावेद अख्तर यांना 'ॲनिमल'च्या टीमने दिले उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com