Maldives parliament: मालदीवच्या संसदेत मोठा राडा; मतदानादरम्यान खासदारांमध्ये हाणामारी

Clash in Maldives Parliament News: मालदीवच्या संसदेतून मोठं वृत्त हाती आलं आहे. मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हाणामारीच्या झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही बाजूच्या खासदारांमध्ये हाणामारी झाल्यानंतर संसदेत एकच राडा झाला.
Maldives parliament News
Maldives parliament NewsSaam tv
Published On

Clash in Maldives Parliament:

मालदीवच्या संसदेतून मोठं वृत्त हाती आलं आहे. मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हाणामारीच्या झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही बाजूच्या खासदारांमध्ये हाणामारी झाल्यानंतर संसदेत एकच राडा झाला. या हाणामारीमुळे संसदेत एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मीडया रिपोर्टनुसार, संसदेतील हाणामारी झाल्याची ही घटना मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझु यांच्या मंत्रिमंडळासाठी होणाऱ्या मतदानाआधी झाली. संसदेत मतदानासाठी सर्वात आधी पीपल्स नॅशनल कांग्रेस आणि प्रोग्रेसिव पार्टी ऑफ मालदीव पक्षाचे खासदार हे सरकारला समर्थन करणारे खासदार होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वातील मालदीवियन डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार होते. (Latest News)

Maldives parliament News
Mona Lisa Painting News: जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर फेकले सूप, शेतकऱ्यांच्या आंदोलनात फ्रान्समध्ये गोंधळ

एका स्थानिक वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, संसदेत बहुमताच्या जोरावार विरोधी पक्षाकडून मुइज्जूंची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या दोन्ही गटात हाणामारी झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maldives parliament News
UP Crime News: धक्कादायक! पती-पत्नीसह तीन मुलांचा होरपळून मृत्यू , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मालदीवच्या संसदेत राडा का झाला?

संसदेतील विरोधी पक्षातील खासदारांनी राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच नव्या मंत्र्यांची नेमणूक करण्यास विरोध केला. तसेच त्यांनी संसदेच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच मुइज्जू यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांची नेमणूक न करण्याची मागणी विरोधकांनी केली.

Maldives parliament News
Arvind Kejriwal: माझ्या 5 मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडून देईल; अरविंद केजरीवाल यांचं भाजपला आव्हान

विरोधी पक्षाचे खासदार बहुमतात कसे?

मालदीवमधील खासदार आणि राष्ट्राध्यक्ष यांच्या वेगवेगळ्या निवडणुका होतात. २०१९ साली मालदीवमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. ज्यात एमडीपी पक्षाला बहुमत मिळाले. मागच्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पिपल्स नॅशनल काँग्रेसचे मुइज्जू निवडून आले होते. त्यामुळे ते सत्ताधारी असले तरी त्यांचं संसदेत बहुमत नव्हतं. आता १७ मार्च २०२४ ला मालदीवमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com