
India-Pakistan Tension: पहलगाममध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केल्याचे पुरावे एनआयएला मिळाले आहेत. एनआयएला पाकिस्तानविरोधात महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. पहलगाम येथील बैसारन खोऱ्यात हल्ला झालेल्या ठिकाणी एनआयएकडून तपास करण्यात आलाय. त्याशिवाय काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकत संशयीतांना ताब्यात घेतले.
एनआयएच्या प्राथमिक तपासात पाकिस्तानविरोधात पुरावे असल्याचे समोर आलेय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI यांचा हात आहे , याबाबतचे पुरावे एनआयएला मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला होता. या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या प्राथमिक अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर यांच्याविरोधात पुरावे सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पुरावे भारत जागतिक स्तरावर उघड करत पाकिस्तानची आणखी कोंडी करण्याच्या तयारी करत आहे.
एनआयएने या हल्ल्याची तपासणी करताना १५० जणांचे जबाब नोंदवले आहेत. 3D मॅपिंग आणि घटनास्थळाच्या पुनर्रचनेचा समावेश असलेला हा प्राथमिक अहवाल लवकरच गृहमंत्रालयाला सादर केला जाईल. अहवालात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांच्या हँडलर्सशी संपर्क असल्याचा उल्लेख आहे. या हल्ल्यात ओव्हर ग्राउंड वर्कर्सची (OGW) मोठी भूमिका असल्याचे अहवालात सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमधील OGW च्या संपर्कांची यादी तयार करण्यात आली आहे. त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.